Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड नताशा दलाल प्रेग्नेंट? करवा चौथचे फोटो पाहून चाहत्यांच्या चर्चांना उधाण

नताशा दलाल प्रेग्नेंट? करवा चौथचे फोटो पाहून चाहत्यांच्या चर्चांना उधाण

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. वरुण धवन आणि नताशा दलाल यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. त्यांचे चाहते अनेकदा या जोडीच्या रोमँटिक फोटोंची वाट पाहत असतात. अलीकडेच करवा चौथच्या दिवशी वरुणने पत्नी नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो समोर आल्यापासून चाहत्यांनी या जोडप्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे… लोकांनी वरुणला थेट प्रश्न विचारला आहे की, त्याची पत्नी नताशा प्रेग्नंट आहे का… आणि तो लवकरच वडील होणार आहे का?

 

या २४ ऑक्टोबर रोजी वरूण धवनने पत्नी नताशासोबत करवा चौथ साजरे केल्यांनतर त्यांचे काही फोटो शेअर केले होते. लग्नानंतरही वरूण त्याचे आणि नताशाचे आयुष्य खूप खासगी ठेवतो. तो आपल्या पत्नीसोबतची निवडक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. करवा चौथवर शेअर केलेल्या फोटोमध्ये वरूण नताशाच्या पोटावर हात ठेवताना दिसत आहे.

वरूण आणि नताशा हे यावर्षी जानेवारीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. २४ जानेवारी रोजी अलिबागमधील एका रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर या जोडप्याने मीडियासमोर येत त्यांचे लग्न झाल्याचे सांगितले. वरूण आणि नताशाचे लग्न अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते आणि या लग्नाची कोणतीही माहिती चाहत्यांसमोर आली नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर वरुण धवन शेवटचा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान होती. सध्या वरूण त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरूणही कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात वरूणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. वरूण धवनचे सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणजे ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘मैं तेरा हिरो’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी २’, ‘दिलवाले’, ‘जुडवा २’, ‘सुई धागा’, ‘कलंक’ आणि ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ आहेत.

साठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा