Tuesday, June 25, 2024

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

कॉमेडी असो किंवा खलनायकाची भूमिका, परेश रावल (paresh raval) हे आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रत्येक स्टाईल ही त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत असते. चित्रपटांमध्ये जितक्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत, तितक्याच रंगांनी त्याचे वैयक्तिक जीवन भरलेले आहे. त्यांच्या पत्नीचे  नाव स्वरूप संपत असे आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. ते त्यांच्या बॉसच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. तिथेच त्यांनी ठरवले होते की, जर मी लग्न केले, तर याच मुलीसोबत करेल, मग ती बॉसची मुलगी असो किंवा बहीण. चला, तर मग ही कहाणी जाणून घेऊया…

परेश रावल यांनी अलीकडेच माध्यमांना एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये ते आपल्या लव्हस्टोरीबद्दल बोलले. त्यांनी सांगितले की, “मी जेव्हा स्वरूपला पाहिले, तेव्हा मी माझ्या मित्राला बोललो होतो की, मला हिच्यासोबत लग्न करायचे आहे.” शेवटी बारा वर्षांनी ही गोष्ट त्यांनी खरी करून दाखवली. या दोघांचे लग्न 1987 साली झाले होते व त्यांना आता दोन मुले आहेत. त्यांच्या मुलांची नावे आदित्य आणि अनिरुद्ध असे आहे. स्वरूपने 1979मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता.

बॉसची मुलगी होती स्वरूप
परेश रावल यांनी जेव्हा स्वरूपला पाहिले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मित्र महेंद्र जोशी होते. तिला पाहून मी म्हणालो होतो की, “हिला माझी पत्नी बनवायचे आहे.” यावर त्यांचे मित्र म्हणाले होते की, “तुला माहिती आहे का ती कोण आहे? तू ज्या कंपनीमध्ये काम करतो तिथल्या बॉसची ती मुलगी आहे.” तेवढ्यात अभिनेता म्हणाले की, “कोणाची पण ती मुलगी असो, बहीण, किंवा आई असूदे, मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.” या गोष्टी नंतर त्यांनी तिला दोन, तीन महिन्यानंतर प्रपोज पण केले आणि म्हणाले की, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, आता असे नको म्हणू की आधी एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करू. कारण, मला माहिती आहे की, कोणी शेवटपर्यंत एकमेकांना समजू शकत नाही, तर या गोष्टीवर वेळ वाया घालवायला नको.”

हम दो हमारे दो मध्ये दिसणार
बारा वर्षानंतर परेश आणि स्वरूप यांनी लग्न केले आणि आता ते खूप खुश आहेत. स्वरूपने काही चित्रपटांमध्ये व टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये ‘हिम्मतवाला’, ‘साथिया’ या दमदार मालिकांचा समावेश आहे.(paresh rawal and swaroop sampat love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या ‘बाबू भैया’पासून ते ‘कांजी भाई’पर्यंत परेश रावल यांनी साकारलेल्या ५ सर्वोत्तम भूमिका; पाहा यादी
B’day special | परेश रावल यांना पहिल्या नजरेत झालं होतं थेट ‘मिस इंडियाशी’ प्रेम; झाडाखाली ९ पंडितांसमोर घेतले होते सात फेरे

हे देखील वाचा