झी मराठी या वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच मालिकेने बहुसंख्य प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघता यावी अशी ही मालिका आहे. मालिकेत प्रत्येक स्वभाव, गुण, प्रत्येक वयोगटातील पात्रांचा समावेश आहे. त्यामुळे अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तीने बसून ही मालिका पाहिली तरी त्याला कंटाळा येणार नाही. या वर्षी झी मराठीने अनेक नवीन विषय घेऊन मालिका आणल्या आहेत. अशीच आजच्या २१ व्या शतकात एकत्र कुटुंब पद्धती काळाआड होत असल्याने कुटुंबाला बांधून ठेवणारी आणि नाती जपणारी ही मालिका सध्या खूप लोकप्रिय होत आहे.
मालिकेतील सगळी पात्र देखील खूप चांगल्या पद्धतीने रेखाटली आहेत. यात मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिड आणि आदिती ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडत आहे. त्याची प्रेमकहाणी देखील पाहायला सगळ्यांनाच आवडत आहे. (Hardik Joshi and amrita Pawar’s romantic video viral on social media)
अशातच या गोड जोडप्याचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ झी मराठी पुरस्कार सोहळ्यातील आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आदितीने आकाशी रंगाची साडी नेसली आहे तर सिद्धार्थने देखील आकाशी रंगाचा कुर्ता घातला आहे. आदिती समोरून चालत येत असते तेव्हा सिद्धार्थ येतो आणि तिचा हात पकडतो. त्यांच्या या व्हिडिओच्या ‘बॅकग्राऊंडला ‘तेनु लेके’ हे गाणे लागले आहे.
त्यांचा हा रोमँटिक व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र डान्स करताना बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
हार्दिकने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले आहे. मालिकेतील त्याचे राणादा हे पात्र सगळ्यांना खूप आवडते होते. तसेच त्याच्या सिद्धार्थच्या या पात्राला देखील सगळ्यांची पसंती मिळत आहे. अमृताने या आधी ‘स्वराज्य जननी जिजामाता’, ‘ललित २०५’, ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा
–अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’
–‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी










