‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य नुकतेच पार पडले आहे. राक्षस आणि देवदूत या कार्यात सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला. यात राक्षसांनी सांगितलेली सगळी कामे देवदूत अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करत होती. या कार्यात टीम ‘ए’ मधून स्नेहा आणि गायत्री हे विजयी झाले, तर टीम ‘बी’ मधून तृप्ती आणि सोनाली हे विजयी झाले. यावेळी बिग बॉस दोन्ही टीमला विचार विनिमय करून बहुमताने प्रत्येक टीमला एक सदस्य निवडायला सांगतात. त्यावेळी टीम ‘ए’ मधून स्नेहा आणि टीम ‘बी’ मधून तृप्ती यांची नावे पुढे येतात.
या आठवड्याचे कॅप्टन्सी टास्क ‘आयना का बायना घेतल्याशिवाय जाईना’ हे आहे. या टास्कमध्ये प्रत्येक टीमला गार्डन एरियामध्ये त्यांची जागा दिलेली असते. तृप्ती आणि स्नेहा यांच्या नावाच्या पाट्या देखील तिथे ठेवलेल्या असतात. त्यावेळी त्यांच्या उमदवाराच्या नावाच्या पाट्या इतरांना आणायच्या असतात. यावेळी जय आणि तृप्ती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झालेला दिसत आहेत. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between jay dudhane and trupti Desai)
टास्कदरम्यान धावपळीत जयकडून तृप्ती यांच्या पायाला लागते आणि त्या खूप ओरडतात. त्या जयला म्हणतात की, “अक्कल आहे का तुला? तोडायचा आहे का पाय माझा? नीट खेळ, काय झालं ना मी तुला सोडणार नाही.” त्यांचा हा रंगाचा उद्रेक पाहून सगळेच अगदी स्तब्ध होऊन जातात. दरवेळीप्रमाणे या टास्कमध्ये देखील चांगलीच धक्का बुक्की झालेली दिसत आहे. तसेच या आठवड्याची कॅप्टन स्नेहा वाघ झाली आहे.
त्यामुळे आता येत्या आठवड्यात स्नेहा घर कसे सांभाळेल आणि कोणाला कोणती ड्युटी देईल हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे
-साप्ताहिक कार्यात मीराने मीनलला दिले ‘हे’ मोठे आव्हान, ऐकून सर्वच झाले स्तब्ध
-बिग बॉस मराठी: ‘जय वीरू’ची जोडी तुटणार? विशालने केले ‘असे’ कृत्य की, विकासला अनावर झाले अश्रू