Friday, March 29, 2024

‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात जसे अतरंगी स्पर्धक आहेत तसेच बिग बॉस देखील त्यांना अतरंगी टास्क देत आहेत. यातीलच चौथ्या आठवड्यात घरात राक्षस आणि देवदूतांमध्ये खेळ रंगला आहे. या आठवड्याची थीम अद्भुत नगरी आहे. यात काही राक्षस आणि देवदूत राहतात. या आठवड्याचे साप्ताहिक कार्य चांगलेच रंगात आले आहे. या टास्कमध्ये मधेच भांडणं होत आहेत तर मधेच मजा मस्ती पाहायला मिळत आहे.

घरात राक्षस देवदूतांना खूप त्रास देत आहेत आणि त्यांना या टास्कमधून बाहेर पडण्यास प्रवृत्त करत आहेत. तर देवदूतांना राक्षस जे काही करायला सांगतील ते हसत मुखाने करायचे असते. याच वेळी देवदूतांना मनोरा देखील रचायचा असतो. यावेळी घरातील राक्षस देवदूतांना खूप त्रास देताना दिसत आहेत. ते त्यांना अनेक गोष्टी करायला सांगत आहेत. (Bigg Boss Marathi 3 : dadus sing a song in anger mood for Vishal)

अशातच विशालने दादूस यांना रागात त्याच्यासाठी एक गाणे म्हणायला सांगितले. तेव्हा दादूस यांनी रागात ‘एकच वाद आमचा विशाल दादा’,, हे गाणे गायले. ज्यावेळी ते गाणे म्हणत होते तेव्हा विशाल त्यांना अजून रागात म्हणा असे सांगत होता. त्यांनी देखील त्यांचा हा टास्क पूर्ण करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडून ‘एकच वादा विशाल दादा’, हे गाणे गायले. त्यांचे हे गाणे बघताना प्रेक्षकांना मात्र चांगलीच मजा आली आहे. नेहमीच शांत दिसणाऱ्या दादूस यांना ओरडताना पाहून सगळ्यांना खूपच मजा आली आहे.

या टास्कमध्ये विशाल आणि विकास यांची जोरदार भांडण झाल्यामुळे प्रेक्षक काहीशा प्रमाणात नाराज आहेत. त्यांच्यातील मैत्री तुटताना पाहून सगळ्यांना दुःख होत आहे. त्यामुळे त्यांनी असे करू नये अशी देखील सोशल मीडियावर चर्चा चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा