अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘अंतिम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. महेश मांजरेकर सध्या ‘बिग बॉस मराठी ३’ या शोचे होस्टिंग करत आहेत. यावेळी त्यांना या शोबाबत काही प्रश्न विचारले गेले.
यावेळी मांजरेकरांना विचारले की, या शोमध्ये तुमचे टॉप फाईच स्पर्धक कोण आहेत? त्यावेळी त्यांनी सांगितले की, “माझे टॉप फाईव्ह असे या परिस्थितीत तरी कोण नाही. कारण इथे लोकं कधीही त्यांचा निर्णय बदलतात. या सिझनचे लोक अगदी कमाल आहेत. पण मला विशाल वाटतो, मीनल, विकास आणि जय वाटतो आणि कुठेतरी उत्कर्ष देखील वाटतो. उत्कर्ष इथे सगळ्यात हुशार आहे. पण का त्या जयच्या सावलीखाली खेळतोय तेच कळत नाही. त्यामुळे तो स्वतःचं नुकसान करून घेतोय. म्हणून त्याला स्वतःचे निर्णय घेता येत नाही. तो खूप हुशार आहे आणि मला तो टॉप फाईव्हमध्ये दिसतो.” (Mahesh manjarekar told his top five contestant of bigg Boss Marathi 3)
यावर त्यांना विचारले जाते की, घरातील समीकरणे बदलत चालली आहे. यावर तुमचे काय मत आहे. यावर ते उत्तर देतात की, “हो समीकरण बदलत चालली आहे. त्या पोरी पण भांडतात आणि परत एकत्र होतात. पण या सगळ्यात तो विशाल हुशार आहे. तो जास्त कोणावर अवलंबून राहत नाही. तो त्याचा खेळ खेळतो. मागील टास्कमध्ये त्याची जरा चिडचिड झाली, जी मला अती वाटली. पण तो चुकीचा नाही खेळला असं मला वाटतं.”
अशाप्रकारे मांजरेकरांनी बिग बॉस स्पर्धकांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून विशाल निकमचे चाहते खूपच खुश झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. या घरात अभिनेत्री नीता शेट्टी ही येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिथिला पालकरचा स्टायलिश लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, हटके पोझने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
-किती गोड! सोज्वळ मयुरीचा ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना भुरळ, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
-दुःखद बातमी! प्रसिद्ध संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास