हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स हे आजकाल खूप नॉर्मल झाले आहे. जवळपास प्रत्येक चित्रपटांमध्ये एक तरी किसिंग सीन असतो. बोल्ड किंवा किसिंग सीन्सचा चित्रपट हिट किंवा प्रसिद्ध होण्यासाठी खूप फायदा होतो असा (गैर)समज आहे. स्मॉल बजेट सिनेमांपासून ते बिग बजेट सिनेमांपर्यंत सर्रास चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिले जातात. स्क्रिप्टची डिमांड म्हणून किसिंग सीन चित्रपटांमध्ये दाखवले जातात. काही चित्रपटांमध्ये खरच अशा सीनची गरज असते, तर काही सिनेमांमध्ये बळजबरी असे सीन टाकले जातात.
बॉलीवूडमध्ये तर शाहरुख, आमिर खान पासून ते आताच्या रणबीर, शाहिद कपूर पर्यंत अनेक अभिनेते पडद्यावर किस करतांना दिसले आहे. मात्र असे देखील काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये असे सीन कधीच दिले नाही तरीही सिनेमे सुपरहिट झाले.
आजच्या या लेखात आपण अशाच काही कलाकारांची नावे पाहणार आहोत जयनी त्यांच्या कारकिर्दीत एकदाही किसिंग सीन दिला नाही.
सलमान खान :
बॉलीवूडचा भाईजान दबंग खान म्हणजेच सलमान खानने मैने प्यार किया सिनेमापासून ते आताच्या भारत सिनेमापर्यंत एकही चित्रपटात किसिंग सीन दिला नाहीये. सलमानने अनेक चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन दिले आहेत मात्र किसिंग सीन तो कधीच देत नाही. त्याचे कारण म्हणजे कुटुंबासोबत चित्रपट बघताना असे सीन आले तर सर्व जण अवघडल्यासारखे होतात. त्याचे सिनेमे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वच जण बघत असल्याने त्याला असे सीन आवडत नाही. सिनेमा साइन करण्याआधी तो ही अट नेहमी दिग्दर्शक, निर्मात्यांना सांगत असतो.
अजय देवगन:
अभिनेता अजय देवगन देखील अशा सीनसाठी ओळखला जात नाही. १००च्या आसपास सिनेमे केलेल्या अजयला ऍक्शन चित्रपटांचा हिरो म्हणून ओळखले जाते. त्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. ९०च्या दशकापासून अभिनयात सक्रिय असलेल्या व असंख्य चित्रपटात काम केलेल्या अजयने एकाही सिनेमात किसींग सीन दिला नाही हे विशेष. बॉलीवूडमधील सलमान, आमीर, शाहरुख, अक्षय व अजय देवगणमध्ये फक्त अजय व सलमानच्या नावावर हा खास विक्रम आहे.
रितेश देशमुख :
अभिनेता रितेश देशमुखने देखील आजपर्यंत एकही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला नाहीये. त्याने काही अडल्ट कॉमेडी चित्रपटात काम देखील नक्कीच केले आहे, मात्र असे सीन देण्यापासून तो नेहमी स्वतःला दूर ठेवतो. त्याच्या म्हणण्यानुसार ‘किस’ ही खूप खाजगी गोष्ट आहे. सार्वजनिकरित्या असे काही करून त्याचा उपयोग मार्केटिंगसाठी करणे चुकीचे आहे.
फवाद खान :
पाकिस्तानी अभिनेता असलेल्या फवादने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. फवाद खान देखील नो किसिंग पॉलिसी पाळतो. बऱ्याच भारतीय लोकांना फवाद आवडतो देखील, मात्र त्याने सुद्धा त्याच्या संपूर्ण करियरमध्ये किसिंग सीन दिले नाहीत.
अली जफर:
पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफर देखील असे सीन देत नाही. त्याच्या म्हणण्यानुसार असे सीन करतांना त्याला खूप अवघडल्यासारखे होईल. त्यामुळे त्याच्या इतर कामावर सुद्धा त्याचा परिणाम होईल. म्हणून तो असे सीन देत नाही.