आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या करीना कपूर खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने जगभरात आपला भलामोठा चाहतावर्ग तयार केला आहे. अभिनयाव्यतिरिक्त करीना सोशल मीडियावरही भलतीच सक्रिय असते. करीना नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकतेच आपला लहान मुलगा जेह अली खानचा योगा करतानाचा फोटो शेअर केला होता. यानंतर ती सध्या एका नवीन पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
करीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला मोठा मुलगा म्हणजेच तैमूर अली खानचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसते की, तैमूर स्विमिंग पूलच्या किनारी मजा करताना दिसत आहे. (Actress Kareena Kapoor Shared The Photo of Her Elder Son Taimur Was Seen Having Fun In The Pool)
करीनाने हा फोटो शेअर करत एक खास कॅप्शनही दिले आहे. तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पूलच्या किनारी चिल करताना प्रत्येकाचा हॉलोवीन लूक पाहताना…” करीनाच्या या फोटोवर फक्त चाहतेच नाहीत, तर कलाकार मंडळीही कमेंट करत तैमूरच्या कौतुकाचे पूल बांधताना दिसत आहेत.
यामध्ये प्रियांका चोप्रा, दिया मिर्झा, अमृता अरोरा आणि अर्जुन कपूर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. प्रियांका, दिया आणि अमृताने कमेंट करत स्माईली इमोजी पोस्ट केली आहे. करीनाने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच १ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्सचा पाऊसही पडला आहे.
विशेष म्हणजे, करीना कपूर प्रेग्नंसीनंतर आता आपल्या कामावर परतत आहे. ती सध्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये आहे. आता ती लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
करीना शेवटची ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान, अभिनेत्री राधिका मदानही मुख्य भूमिकेत होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










