Monday, June 17, 2024

आनंदाची बातमी! अंकिता अन् विकी अडकणार लग्नाच्या बेडीत, डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे?

सध्या मोठ्य पडद्यावरील कलाकारांसोबतच छोट्या पडद्यावरील कलाकारांच्याही लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर- आलिया भट्ट आणि विकी कौशल- कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचाही या यादीत समावेश झाला आहे. अंकिता आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन लवकर लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

अंकिता दीर्घ काळापासून विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. याव्यतिरिक्त हे जोडपे नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, लग्नाच्या बातम्यांमध्ये अंकिता आणि विकीने शेवटी लग्नासाठी दिवस ठरवला आहे. (Actress Ankita Lokhande And Vicky Jains Wedding Date Revealed Couple Can Get Married In December)

माध्यमांतील वृत्तांनुसार, अंकिता आणि विकीने आपल्या या खास दिवसासाठी १२, १३ आणि १४ डिसेंबर ही तारीख ठरवली आहे. असे म्हटले जात आहे की, या जोडप्याने आपल्या लग्नासाठी जवळच्या काही कलाकार मित्रांना आणि नातेवाईकांना आधीच सांगितले आहे. असे असले, तरीही आतापर्यंत या जोडप्याकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.

असेही वृत्त आहे की, अंकिता आणि विकीच्या लग्नासाठी निमंत्रण पत्रही छापण्यास सुरू झाले आहे. त्यानंतर लवकरच नातेवाईक आणि मित्रमंडळींना निमंत्रण पाठवले जाईल. अंकिता आणि विकी जैन जवळपास साडे- तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

दोघेही नेहमीच सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करतात. नुकतेच दिवाळी पार्टीतील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

विकीबाबत बोलायचं झालं, तर तो व्यावसायिक आणि चित्रपट निर्माता आहे. अंकिता आणि विकीची भेट दोघांच्या कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. यानंतर दोघांची अनेकदा भेट झाली आणि मैत्रीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. विकीपूर्वी अंकिता, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, सन २०१६ मध्ये दोघेही वेगळे झाले होते.

या वर्षाच्या शेवटी अनेक कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. यापूर्वी असे वृत्त होते की, राजकुमार राव आणि पत्रलेखा नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत.

हे देखील वाचा