आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मग ते त्यांचे आगामी चित्रपट असो किंवा बालपणीचे फोटो. अलीकडच्या काळात बॉलिवूड कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेषतः चाहत्यांना त्यांचे बालपणीची फोटो पाहायला खूप आवडतात. सध्या असे दिसत आहे की, सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला आहे की, फॅन पेज त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटो पोस्ट करून त्यांना ओळखण्याचे आव्हान देतात. अनेक कलाकारांचे फोटो पाहून चाहत्यांना ते खरोखरच त्यांचे आवडते कलाकार असल्याचा अंदाज लावणे कठीण जात होते. या मालिकेत एका सुपरस्टार अभिनेत्याचा बालपणीच्या फोटोंचा व्हिडिओ समोर आला आहे, जो चाहत्यांसाठी परीक्षेपेक्षा कमी नाही. चला तर मग हा अभिनेता कोण आहे हे जाणून घेऊया.
हा अभिनेता दुसरा कोणी नसून लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदत करणारा, अडचणीत असणाऱ्या सर्वसामान्यांचा आधार बनलेला कलाकार आहे. तुम्हाला आता समजलेच असेल हा अभिनेता कोण आहे. होय, तो अभिनेता आहे लाखो हृदयांवर राज्य करणारा सोनू सूद. सोनू आज गरिबांचा देवदूत बनला आहे. या व्हिडिओतील फोटो त्याच्या लहानपणीचा आहे, ज्यामध्ये तो किती निरागस दिसतोय हे तुम्ही पाहू शकता.
सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील त्याच्या या फोटोला पसंती देत आहेत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांचे फोटो समोर आले आहेत. करीना कपूरपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सर्वच कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहायला मिळाले आहेत.
सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘किसान’ चित्रपट साईन केला आहे. याशिवाय तो ‘पृथ्वीराज’मध्येही दिसणार आहे. नुकताच सोनू सूदचा ‘साथ क्या निभाओगे’चा एक म्युझिक व्हिडिओही प्रदर्शित झाला आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर
-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल