Wednesday, April 17, 2024

चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांना गुरुवारी (२८ ऑक्टोबर) चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) चेन्नईतील कावेरी हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. पण आता रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना रविवारी (१ नोव्हेंबर) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता त्यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांनी स्वतः घरचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

रजनीकांत यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते रात्री उशिरा घरी परतले आहेत. तब्येत बिघडल्याने त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी पोहोचल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याने चाहत्यांना याची माहिती दिली आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या फोटोत ते घरातील मंदिरासमोर उभे राहून प्रार्थना करताना दिसत आहे. रजनीकांत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रजनीकांत यांनी कॅप्शन लिहिले आहे की, “मी घरी परतलो आहे.” यासोबतच त्यांनी हात जोडून एक इमोटिकॉन बनवला आहे.

याशिवाय सोशल मीडियावर रजनीकांत यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते कारमधून त्यांच्या घरी पोहोचताना दिसत आहेत. त्यांची पत्नी लता दाराबाहेर त्यांची आरती करत आहेत.

रजनीकांत यांना ४ दिवसांपूर्वी करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
रजनीकांत यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांच्या कॅरोटीड आर्टरीची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते की, “रजनीकांत यांना चक्कर आल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात असून त्यांना कॅरोटीड आर्टरी रिव्हॅस्क्युलरायझेशनचा सल्ला देण्यात आला आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल.”

नुकताच मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास आठवला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते घरी आल्यानंतर विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांचे हजारो चाहते त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’चा किताब जिंकून घरी परतली दिव्या; बॉयफ्रेंड वरुणने खास अंदाजात केले स्वागत

हे देखील वाचा