सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, मात्र अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने हुमा कुरेशीला कायदेशीर नोटीस पाठवण्याची धमकी दिली आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती हुमा कुरेशीला धमकावताना दिसत होती. खरं तर, सोनाक्षी ही पोस्ट करून हुमाची मस्करी करत होती. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर हॅलोविनचा एक फोटो पोस्ट केला आहे.
हुमा कुरेशीची केली मस्करी
स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट करत सोनाक्षीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कॉम्प्लिमेंट्स मिळवण्यासाठी माझे फोटो तुझे म्हणून पोस्ट करणे थांबव. मी आता तुला कायदेशीर नोटीस पाठवत आहे. खरं तर, हुमा कुरेशीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा एका मास्कच्या मागे लपलेला दिसत आहे. या फोटोमध्ये हुमा काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे आणि त्यासोबत तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. (sonakshi sinha threatens huma qureshi with legal notice says stop posting my picture and tell yours)
स्वत:चा हा फोटो शेअर करत हुमा कुरेशीने लिहिले, “हॅप्पी हॅलोविन. काल रात्रीचा फोटो.” तिच्या या फोटोवर कमेंट करताना सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, “तू माझ्या परवानगीशिवाय माझे फोटो का पोस्ट करत आहेस आणि ते तुझेच असल्यासारखे सांगत आहेत?” सोनाक्षीशिवाय ट्विंकल खन्नानेही हुमाच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
साकिब सलीमने केली ‘अशी कमेंट’
हुमा कुरेशीच्या पोस्टवर तिचा भाऊ साकिब सलीमनेही कमेंट केली. सोनाक्षीची बाजू घेत साकिबने लिहिले, “इथेही चिटिंग.” त्यानंतर सोनाक्षीने उत्तर दिले की, “लोकांनी तिला सुंदर म्हणावे असे वाटते, म्हणून ती माझे फोटो वापरत आहे. समजावून सांगा तिला.” हुमा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत ‘बेलबॉटम’ या चित्रपटात दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर केलेली मस्करी कपिल शर्माला पडली भलतीच महागात, रागाच्या भरात सोनाक्षीने…
-‘गँग्स ऑफ वासेपूर’मधून हुमा कुरेशी झाली तूफान हिट; ‘या’ जाहिरातने बदलून टाकले होते तिचे अवघे जीवन