आपल्या दमदार अभिनयाने आणि डान्सने कायम चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले. राशी सूदने गायलेले ‘मिल माहिया’ या गाण्यामध्ये सोनाक्षीचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. या गाण्यामध्ये सोनाक्षीने केलेल्या डान्सने चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिचा रावडी अंदाज रसिक प्रेक्षकांना खूप आवडला. अशात याच गाण्याच्या प्रमोशनसाठी ती ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहचली.
या शोमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर विनोदी पंच मारले जातात. अशात सोनाक्षी तरी या विनोदी पंच पासून कशी काय वाचेल! शोमध्ये कपिल तिच्यावर विनोद करत वडील शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव घेतो. तिला या गोष्टीचा खूप राग येतो आणि ती कपिलला जोरदार बुक्का देते. (Comedian Kapil Sharma make fun of Shatrughan Sinha Sonakshi give one Big punch to Kapil)
कपिलने या शोमध्ये सोनाक्षी बरोबर एक रील व्हिडिओ बनवला आहे. ही त्याच्या आयुष्यातील पहिली इंस्टाग्राम रील आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनाक्षी ‘मिल माहीया’ गाण्यावर डान्स करत असते. तेवढ्यात तिथे कपिल येतो आणि तिला म्हणतो की, “भेटायला आलो, तर तुझे बाबा बोलतात खामोश.” हे ऐकून तिला राग येतो आणि ती त्याला एक जोरदार बुक्का मारते. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना या शोचा पूर्ण भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ‘दबंग ३’ या चित्रपटामध्ये साल २०१९ मध्ये झळकली होती. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ आणी ‘ककुडा’ या दोन आगामी चित्रपटांमध्ये ती झळकणार आहे. ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, एमी विर्क, शरद केळकर हे कलाकार झळकणार आहेत.
‘ककुडा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये सोनाक्षीसह रितेश देशमुख आणि साकिब सलीम मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा एक भुताचा चित्रपट आहे. आदित्य सरपोतदार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद










