Wednesday, February 5, 2025
Home मराठी आनंदाची बातमी! ब्लॉकबस्टर ‘बाहुबली’ चित्रपट पाहायला मिळणार मराठीत, ‘या’ कलाकारांनी दिलाय आपला आवाज

आनंदाची बातमी! ब्लॉकबस्टर ‘बाहुबली’ चित्रपट पाहायला मिळणार मराठीत, ‘या’ कलाकारांनी दिलाय आपला आवाज

‘बाहुबली’ या अभिजात कलाकृतीचा मराठमोळा साज प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीने चित्रपटसृष्टीतील दिग्गज मान्यवर मंडळीसाठी नुकतेच पुण्यात या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. या स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या दिग्गज मान्यवरांनी या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले. मूळ चित्रपटाच्या तोडीस तोड भव्यता जपत सादर करण्यात आलेल्या या मराठी ‘बाहुबली’ चित्रपटाचे प्रक्षेपण दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे गुरूवार (४ नोव्हेंबर) दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर करण्यात येणार आहे.

नेहमीच यशस्वी अनोख्या संकल्पना राबविणाऱ्या ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने मराठी बाहुबलीच्या निर्मितीसाठी तितकीच मेहनत घेतली आहे. बाहुबलीच्या यशाचे मापदंड लक्षात घेता त्याच्या तोडीस तोड मराठी चित्रपट आणताना ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने कोणतीही कसर सोडलेली नाही. चित्रपटाच्या डबिंगसाठी १२० हून अधिक कलाकारांचा सहभाग होता. चित्रपटाचे डबिंग अचूक व्हावे यासाठी कलाकारांच्या निवडीपासून ते त्यांच्या आवाजाच्या चाचणीपर्यंत प्रत्येक कलाकाराला कठोर निकषातून जावे लागले. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, मेघना एरंडे यांनी ‘मराठी बाहुबली’साठी आपला आवाज दिला आहे. याच्या कलात्मक दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी, तर लिखाणाची जबाबदारी स्नेहल तरडे यांनी सांभाळली आहे. (Baahubali Will Telecast On Shemaroo Marathi Bana In Marathi On 4 November)

गाण्यांच्या पुन:निर्मितीवर तितकेच लक्ष देताना मूळ बाहुबलीच्या गाण्यांचा बाज आणि साज याला धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेत संगीताची जबाबदारी कौशल इनामदार यांना सोपवली, तर गीतलेखनाची जबाबदारी वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी सांभाळली. यातील गाण्यांना आदर्श शिंदे, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे.

याप्रसंगी बोलताना शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा सांगतात की, “शेमारू मराठीबाणा वाहिनीला नेहमीच प्रेक्षक़ांचे आणि इंडस्ट्रीचे प्रेम लाभले आहे. उत्तम संकल्पना राबवत दर्जेदार मनोरंजक कार्यक्रम देण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे. त्याच दिशेने वाटचाल करत मराठी बाहुबलीची दिवाळी भेट आम्ही प्रेक्षकांसाठी आणली असून हा चित्रपट प्रेक्षकांची दिवाळी अजून खास करेल,” असा विश्वास ते व्यक्त करतात.

‘बाहुबली’ या चित्रपटाने बॅालिवूड आणि प्रादेशिक चित्रपटांमधील सीमारेषा धूसर केली आहे. ‘मराठी बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल भेट ठरेल आणि वाहिनीसाठी सुद्धा ही एक मोठी झेप ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पिळगावकर जोडप्याने मराठमोळ्या अंदाजात दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, फोटो होतोय व्हायरल

-‘…तू माणूस म्हणून बी किंग हाय’, वाढदिवशी मराठमोळ्या किरण मानेने भन्नाट अंदाजात दिल्या शाहरुख खानला शुभेच्छा

-कातिलाना! सोनालीने सादर केला तिचा ‘हॅलोविन’ लूक; चाहते सोडा, सेलिब्रिटीही पडतायत तिच्या प्रेमात!

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा