प्रेक्षकांना जेवढी नवीन चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता असते त्यापेक्षा अधिक उत्सुकता त्यांना त्या सिनेमातील गाण्यांची असते. सिनेमातील गाणी त्या चित्रपटाचा आत्मा असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सिनेमा हिट होईल की, नाही हे त्याच्या गाण्यावरूनही कधीकधी समजते. सिनेमा हिट होण्यासाठी किंवा प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणण्यासाठी गाणी महत्वाची भूमिका निभावतात. आजच्या तरुणांसाठी गाणी तर खूपच जास्त महत्वाची असतात.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच ‘तडप’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना हा ट्रेलर खूप आवडला असून त्यात अहानचा रफ अँड टफ अंदाज खूपच भाव खाऊन जात आहे. आता हा सिनेमातील पहिले गाणे ‘तडप’ प्रदर्शित झाले आहे.
‘तुमसे भी ज्यादा’ हे गाण्याचे नाव असून हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्यात तारा आणि अहानची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. हे गाणे आता तरी एक मोंटाज सॉन्ग असून, यात तारा आणि अहान यांच्यातील अनेक रोमंटिक क्षण दिसत आहे. याशिवाय या गाण्याच्या शेवटी असणारा एक संवाद सर्वांनाच आवडत आहे. तो संवाद आहे, ‘दिल हैं भी बडी अजीबसी चीज हजारोसे लढ जाता हैं और किसी एक से हार जाता हैं’.’
या गाण्याचा व्हिडिओ अहान शेट्टीने देखील त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, हे गाणे अधिकृतरित्या टि-सिरीजच्या यूट्यूब चॅनेलवरून प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे शब्द इर्शाद कामिलने लिहिले असून, या गाण्याला अरिजित सिंगने स्वरबद्ध केले आहे. ‘तडप’ हा सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत असून, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. फॉक्स स्टार स्टुडिओजद्वारा प्रस्तुत आणि साजिद नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रोडक्शनचा हा सिनेमा साजिद नाडियाडवाला तयार करत आहे. मिलन लुथरिया यांचे दिग्दर्शन असलेला ‘तडप’ हा सिनेमा ‘आरएक्स 100’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी
-जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
-खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट