Sunday, May 19, 2024

जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

बॉलिवूडमधील रोमान्सचा बादशहा अशी ज्याची सर्वत्र ओळख आहे, असा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. ९० च्या अनेक रोमँटिक चित्रपटात काम करून त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याचा ठसा उमटवला आहे. या क्षेत्रात येण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आहेत. म्हणूनच तो आज एक नावाजलेला आणि लोकप्रिय अभिनेता आहे. अशातच मंगळवारी (२ नोव्हेंबर) शाहरुख त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाऊन घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी.

शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्ली येथे झाला आहे. अगदी लहानपणापासूनच अंगात अभिनयाचा किडा असल्याने, कोणतेही बॅकग्राउंड नसताना त्याने स्वतःच्या विश्वासावर आणि बळावर अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचा काळ‌ खूपच खडतर आणि संघर्षमय होता. अगदी राहायला घर न नसल्याने एक वडापाव खाऊन त्याला फुटपाथवर झोपावे लागायचे. परंतु म्हणतात ना, परिस्थिती काही आयुष्यभरासाठी सारखीच नसते. असेच त्याची ओळख आता बॉलिवूडचा सुपरस्टार अशी आहे. (Birthday special : let’s know some interesting things about shahrukh khan)

त्याने १९९२ साली ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि तो त्याच्या करिअरमध्ये केवळ प्रगतीच करत राहायला. तो केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर एक दिलदार व्यक्ती देखील आहे. आज तो एक सुपरस्टार आहे परंतु तरी देखील त्याच्या चाहतांसोबत आणि मीडियासमोर त्याचा वावर अगदी फ्रेंडली असतो.

शाहरुख खानच्या स्वभावातील खास गोष्ट म्हणजे त्याची विनोदी वृत्ती. अनेक ठिकाणी त्याच्यातील हा गुण दिसून येतो. एवढंच काय तर चित्रपटात देखील कोणतेही पात्र असो त्याचा विनोदी स्वभाव त्यात दिसून येतोच. तो अगदी मजा मस्ती करत करता समोरच्याला गप्प करतो.

याचेच एक उदाहरण म्हणजे‌ शाहरुख खान हा आयपीएल (केकेआर) या टीमचा मालक आहे. एकदा मंदिरा बेदीने त्याला विचारले की, “शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्स आणि प्रीती झिंटा किंग इलेवन या टीमच्या मालकीण आहेत. यामुळे तुमचे नाते खराब होणार नाही का? यावर शाहरुख असे काही उत्तर दिले होते, ज्यामुळे मंदिरा बेदी हैराण झाली होती. त्याने उत्तर दिले होते की, “मला असे नाही वाटत, हे बघ मी त्यांचे करिअर सुरू केले आहे आणि जेवढं मला आठवतात त्यानुसार तुझ्या करिअरची सुरुवात देखील मीच केली आहे.”

शाहरुख हा त्याची पत्नी गौरी खानवर खूप प्रेम करतो. त्याने अनेक मुलाखतीत तिचा उल्लेख केले आहे. त्याने एकदा सांगितले होते की, “जर मला वाटले तर मी असे म्हणू शकतो की, माझी पत्नी माझ्यासाठी जेवण बनवते. पण असे नाहीये. ती जेवण बनवायला कधी शिकलीच नाही. त्यामुळे तिच्याकडे एका पेक्षा एक सरस आचारी आहेत. मी जेव्हा जेव्हा एक पती आणि वडील म्हणून अयशस्वी होतो. तेव्हा खेळणी आणि डायमंड माझे काम सोप्पे करतात.”

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जौहरने त्याला न्यूड पोझबाबत प्रश्न विचारला होता. त्याने विचारले होते की, “जर कोणी तुला बिलियन डॉलर दिले तर तू न्यूड पोझ देशील का?” यावर शाहरुख खानने उत्तर दिले होते की, “यापेक्षाही कमी पैशावर मी तयार होऊ शकतो.”

शाहरुख खानला त्याच्या सेक्सुलीटीबद्दल प्रश्न विचारला होता. त्याला विचारले होते की, “तुम्ही बायसेक्शुअल आहात का?” यावर त्याने उत्तर दिले होते की, “नाही, मी ट्राय सेक्शुअल आहे. कारण मी नेहमीच ट्राय करत असतो.”

शाहरुख खान जेव्हा वडील झाला तेव्हा त्याला विचारले होते की, वडील झाल्यानंतर त्याच्या अभिनय शैलीत कशाप्रकारे बदल आला आहे. यावर त्याने उत्तर दिले होते की, “मी माझ्या हेरॉईनला आता लहान मुलांप्रमाणे वागवतो. मी तिला उठवतो, मिठी मारतो आणि बेबी याच नावाने आवाज देतो.” यावरूनच आपण त्याच्या विनोदी स्वभावाचा अंदाज लावू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

-आर्यनसाठी शाहरुख आणि गौरीने घेतले दोन मोठे निर्णय; दिवाळीनंतर आर्यन जाणार ‘मन्नत’पासून लांब

हे देखील वाचा