मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ होय. या शोने टीआरपीच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. अनेक मालिकांना मागे सारून या शोने टीआरपीच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. या शोमध्ये आपल्याला अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अनेक नवीन नाती जुळतात तर अनेक जुनी नाती तुटताना दिसत आहेत. तसेच या वीकेंडला कोणत्या तरी स्पर्धकाची घरातून एक्झित होणार आहे.
या आठवड्यात सोनाली, जय, तृप्ती, मीनल हे सदस्य टास्कमध्ये नॉमिनेट झाले, तर मागील आठवड्यात उत्कर्षने पावर कार्ड स्वीकारून विशालला नॉमिनेट केले होते. म्हणजेच या आठवड्यात असे हे पाच जण नॉमिनेट आहेत. या आठवड्यात नक्की कोण बाहेर जाईल याची धाकधूक अनेकांना लागली आहे. नॉमिनेट झालेले सगळेच स्पर्धक खूप चांगले असल्याने नक्की कोणाला मत द्यावे असा प्रश्न अनेकांना पडला होता. चला तर जाणून घेऊया या आठवड्यात कोण सेफ असेल आणि कोण अनसेफ असेल. (Bigg Boss Marathi 3 : this contestant will eliminate from house)
हाती आलेल्या माहितीनुसार, या पाच जणांपैकी वोटिंगच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर विशाल निकम हा राज्य करत आहे. विशाल घरात पहिल्या आठवड्यापासून नॉमिनेट झाला आहे. परंतु पहिल्या आठवड्यापासून तो व्होटिंगच्या बाबतीत इतर स्पर्धकांना डावलून पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर बहुमताने या शोमधील धाकड गर्ल मीनल शाह आहे.
यासोबतच तिसऱ्या क्रमांकावर जय दुधाने आहे. चौथ्या क्रमांकावर सोनाली पाटील आहे तर शेवटी म्हणजेच पाचव्या स्थानावर तृप्ती देसाई आहेत. या आधी हाती आलेल्या माहितीनुसार, जय दुधाने हा चौथ्या क्रमांकावर होता परंतु त्याच्या चाहत्यांनी त्याला चांगली साथ दिल्याने तो सोनाली पाटीलला डावलून तिसऱ्या स्थानी आला आहे.
वोटिंगनुसार या आठवड्यात सोनाली आणि तृप्ती देसाई डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे आता या दोघींपैकी एक कोणीतरी या आठवड्यात घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. युझर्सने केलेल्या कमेंट्सनुसार या आठवड्यात तृप्ती देसाई यांचा प्रवास थांबण्याची शक्यता आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो