छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेने सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. यामधील प्रत्येक पात्राचा विशेष चाहतावर्ग आहे. यातील प्रत्येक पात्राच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची माहिती चाहत्यांना मिळत असते. नुकतेच मालिकेत ‘जेठालाल’ हे पात्र साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी नुकतीच आपल्या घरी नवीन कार गाडी आणली आहे. दुसरीकडे, ‘बबिता जी’ हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताही एका नवीन घराची मालकीण बनली आहे. अशातच आता वृत्त समोर आले आहे की, या मालिकेत ‘भिडे मास्टर’ची मुलगी ‘सोनू’चे पात्र साकारणाऱ्या पलक सिंधवानीनेही आपल्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे. वयाच्या २३ व्या वर्षी स्वत:चे घर विकत घेऊन पलकने सर्व चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.
खरं तर, पलक सिंधवानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी जोडलेली असते. अशातच तिची एक पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये पलक एका नवीन घरात दिसत आहे. पलकने फोटो शेअर करत चाहत्यांना सांगितले आहे की, ती नवीन घरात शिफ्ट झाली आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Palak Sindhwani Bought Her New Home)
पलकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे चाहते तिला सतत शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोबतच अभिनेत्रीला विचारत आहेत की, तिने नवीन घर विकत घेतले आहे का? फक्त पलकचे चाहतेच नाही, तर अनेक कलाकारही तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत. या फोटोंमध्ये पलक पीच रंगाच्या सूटमध्ये आपल्या नवीन घरात पोझ देताना दिसत आहे.
फोटो शेअर करत पलकने स्वत:च स्पष्ट केले आहे की, ती नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे. आपल्या लिव्हिंग रूममधील हा फोटो शेअर करत पलकने आपल्या घरातील फर्निचर फ्लॉन्ट करत आहे. पलकचे हे नवीन अपार्टमेंट आणि यातील इंटिरिअर तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.
पलक मागील काही वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेशी जोडलेली आहे. पलकने खूप कमी वयात अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनूचे पात्र साकारून तिने खूप प्रसिद्धी मिळवली. सोनूचे पात्र प्रेक्षकांनी खूप आवडते. पलकला इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका










