मंगळवार हा बाॅलिवुड अभिनेत्री यामी हिच्या साठी खुप खास होता. कारण आर्टिकल 370 या चित्रपटातील तिच्या उत्तम आणि दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 2024 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुजरातच्या एकता नगर मध्ये हा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या दरम्यान यामीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान प्रधान करण्यात आला.
पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना यामी (yami)म्हणाली की, ती अजूनही हा क्षण पूर्णपणे अनुभवण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनयाचे स्वप्न घेऊन देशाच्या विविध भागांतून मुंबईत येणाऱ्या अनेक तरुणांना तिने एक संदेशही दिला. तसेच ती म्हणाली की, ज्या कलाकारानी आपले संपुर्ण आयुष्य आपल्या कामासाठी समर्पित केले आहे, त्याच्यासाठी राष्ट्रिय पुरस्कार मिळला पाहिजे. तसेच या दरम्यान यामीचे पती आदित्य धर हे यामीला सन्मान स्वीकारताना पाहत होता.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही, यामी गौतमने तिच्या भविष्यातील प्रवासाविषयी सांगितले. ती म्हणाली की, तिच्या प्रवासात ती कुठे पोहोचली आहे हे तिला माहीत नाही, कारण तिला अजून खूप काही शिकायचे आहे आणि खूप काम करायचे आहे. ऑफिसवरही त्याने चांगली कामगिरी केली. आणि या पुढे ती अजुन अनेक चित्रपटामध्ये काम करायचे असल्याचे सांगितले आहे. तसेच तीला हा सन्मान मिळाल्याने अनेक चाहते, कलाकार हे सोशल मिडीयावर तिचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा
प्रभासचा फौजी पुढे का ढकलण्यात आला? निर्मात्यांकडून मोठी माहिती समोर










