Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ही दोस्ती तुटायची नाय!’ विशाल आणि विकासमधील मैत्री प्रेम पाहून भारावून गेला महाराष्ट्र

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात अनेकांची घट्ट मैत्री आपण पाहत आहोत. यात विशाल – विकास, गायत्री – मीरा, जय – उत्कर्ष यांच्या मैत्रीच्या सर्वत्र चर्चा चालू असतात. घरात आठव्या आठवड्यात साप्ताहिक कार्यात विजय मिळवून जय आणि विशाल हे कॅप्टन्सी पदासाठी उमेदवार होतात. त्यानंतर आता घरात कॅप्टन्सी टास्क जोरदार रंगला आहे.

घरातील स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी अंदाज लावला होता, त्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि भयानक टास्क बिग बॉसने दिला.‌ कॅप्टन्सी कार्यात उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी घरातील सदस्यांना काहीतरी गमवावे लागणार होते. त्यांनी जर त्या गोष्टी गमवल्या तरच त्यांना पाठिंबा देता येणार आहे. बिग बॉसने ‘पारडे कॅप्टन्सी’चे हे कार्य घरातील सदस्यांवर सोपवले होते. (Bigg Boss Marathi 3 : Vishal and vikas cut their hairs in captain task)

यावेळी कॅप्टन्सी कार्यात सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी बिग बॉसने विकासलला टक्कल करण्यासाठी सांगितले. तो विशालला पाठींबा देण्यासाठी टक्कल करण्यास तयार होतो. यावेळी विशाल त्याचा टक्कल करतो आणि स्वतःचा पण टक्कल करतो. त्यांच्यातील हे मैत्री प्रेम पाहून अवघ्या महाराष्ट्राला त्यांचे कौतुक वाटले आहे. त्यांचा हा सीन पाहून सगळेच खूप भावुक झाले आहेत.

सोशल मीडियावर नुसते विकास आणि विशालच्या मैत्रीचे गोडवे गायले जात आहेत. सर्वत्र त्यांनी जे काही केले त्यासाठी कौतुक होत आहे. त्यांच्या या सीननंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावर कमेंट्स करून त्यांनी केलेल्या गोष्टीचे खूप कौतुक करत आहेत. आपल्या वाट्याला कॅप्टन्सी येणार नाही याची पूर्ण खात्री असताना देखील त्यांनी एवढा मोठा त्याग केला यामुळे त्या दोघांचे कौतुक चालले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा