असं म्हणतात की, आयुष्यात एखाद्या व्यक्तीला रडवणे खूप सोप्पे असते, परंतु तेच एका उदास व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणणे ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अभिनयात देखील थोडासा भावनिक क्षण तयार करून आपण प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. परंतु तेच प्रेक्षकांना खळखळून हसवणे अवघड काम काम असते. असेच प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात नेऊन सोडणारे अभिनेते म्हणजे जॉनी वॉकर होय. ६०-७० दशकात जॉनी वॉकर कॉमेडी किंग होते. गुरुवारी (११ नोव्हेंबर) जॉनी वॉकर यांची जयंती आहे. चला तर या निमित्त जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.
जॉनी वॉकर हे त्यांच्या दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या अभिनयामुळे सर्वत्र प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात करण्याआधी अभिनयाचा कोणताही क्लास लावला नव्हता. ते सुरुवातीला एका बस कंडक्टर होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक बस कंडक्टर ते एक कॉमेडियन बनण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. (Johnny Walker birth anniversary : let’s know about his life)

जॉनी सुरुवातीला एक बस कंडक्टर होते. तेव्हा अनेकवेळा बलराज साहनी यांनी त्यांना प्रवाशांचे मनोरंजन करताना पाहिले होते. एका दारुड्याचा अभिनय करून ते लोकांना खूप हसवत असायचे. त्यांनी जॉनी यांची गुरू दत्त यांच्याशी भेट घडवून दिली. गुरू दत्त जॉनी यांचा अभिनय पाहून प्रभावित झाले. त्यांनी जॉनी त्यांना त्यांच्या चित्रपटात काम दिले.
गुरू दत्त यांनी जेव्हा जॉनी यांनी दारू पिणाऱ्या व्यक्तीचा अभिनय केला. तेव्हा सुरुवातीला मात्र त्यांना राग आला. परंतु तेव्हा त्यांना जाणवले की, न दारू पिता देखील ते अभिनय करू शकतात. हा विचार करून ते हैराण झाले आणि त्यांनी बोनी यांना चित्रपटात काम दिले.

जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दिन जमालुद्दिन हे होते. त्यांनी हे नाव बदलून जॉनी वॉकर असे ठेवले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात दारूला कधी स्पर्श देखील केला नाही. परंतु चित्रपटातील त्यांचा हा अभिनय सगळ्यांना खूप आवडायचा. त्यांनी एका लोकप्रिय व्हिस्की ब्रँडच्या नावावर एक नवीन नाव दिले होते.
जॉनी वॉकर यांनी ‘मुगल ए अजम’, ‘बहु बेगम’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी २९ जुलै २००३ साली या जगाचा निरोप घेतला.
अधिक वाचा-
– निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून उडाली चाहत्यांची झोप, वाढला इंटरनेटचा पारा
–उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; ड्रेसची स्टाईल बघून नेटकरी म्हणाले, ‘मी बकरीला…’