‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यापासून तेलुगू सिनेमातील अभिनेता प्रभासची लोकप्रियता भारतभर वाढली आहे. अशातच प्रभासने मेगा-बजेट चित्रपट ‘आदिपुरुष’चे शूटिंग पूर्ण केले आहे आणि लवकरच तो कन्नड-तेलुगू ऍक्शन थ्रिलर ‘सालार’मध्ये व्यस्त होणार आहे. याशिवाय तो त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटासाठीही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. निर्मात्यांकडून कोणतेही अपडेट न मिळाल्याने एका चाहत्याने या चित्रपटाबद्दल सुसाईड नोट लिहिली आहे.
चाहत्याचा दावा- पहिल्यांदाच लिहिली नोट
ही सुसाईड नोट आंध्र प्रदेशातील एका चाहत्याने लिहिली आहे. तो म्हणतो की, तो खूप दिवसांपासून त्याचा आवडता स्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या (राधे श्याम) अपडेटची वाट पाहत आहे. मात्र अद्याप याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्याच्या आत्महत्येला यूवी क्रिएशन टीम आणि दिग्दर्शक राधा कृष्ण जबाबदार असल्याचा आरोप चाहत्याने केला आहे. चाहत्याने सांगितले की, त्याने आयुष्यात कधीही एकही पत्र लिहिले नाही, पण पहिल्यांदाच त्याने एका चित्रपटासाठी सुसाईड नोट लिहिली आहे.
चाहता राधे श्यामची आतुरतेने पाहत आहे वाट
सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने लिहिले की, तो प्रभासच्या चित्रपटाच्या अपडेटची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे. पण ‘राधे श्याम’चे निर्माते प्रभासच्या चाहत्यांची विनंती ऐकत नाहीत, हे पुरेसे आहे की नाही, असे विचारत आहे. प्रभासच्या फिल्मी डायलॉगच्या स्टाइलमध्ये फॅनने ही नोट लिहिली आहे. मात्र, चाहत्याच्या या नोटपूर्वीच ‘राधे श्याम’चा पहिला टीझर चित्रपट निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. प्रभासही त्याच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने त्याला सतत अपडेट्स देणे शक्य नाहीये आणि अशाप्रकारे चाहत्याने अशा गोष्टींचे लेखन करणे, याला काही अर्थ नाही.
Here's why #Prabhas' fan penned a suicide note!https://t.co/29kc3n12XO
— @zoomtv (@ZoomTV) November 12, 2021
प्रभासला भेटण्यासाठी फॅन चढला होता मोबाईल टॉवरवर
एखाद्या चाहत्याने आपल्या आवडत्या स्टारबद्दल असा वेडेपणा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चाहत्यांनी असा वेडेपणा दाखवला आहे. काहीवेळा चाहत्यांची क्रेझही स्टारला महागात पडते. असे अनेक चाहते आहेत जे स्वतःचे नुकसान करायला मागेपुढे पाहत नाहीत. असेच काहीसे तेलंगणातील जंगम येथे पाहायला मिळाले. येथे साऊथचा सुपरस्टार प्रभासचा एक चाहता मोबाईल टॉवरवर चढला आणि अभिनेत्याला भेटला नाही, तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. ही घटना २०१९ सालची आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…