Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी एकदम झक्कास! अभिनेत्री नीलम गिरीने दुबईच्या रस्त्यावर दाखवले लटके-झटके, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

एकदम झक्कास! अभिनेत्री नीलम गिरीने दुबईच्या रस्त्यावर दाखवले लटके-झटके, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

भोजपुरीची ‘एक्सप्रेशन्स क्वीन’ नीलम गिरी अनेकदा चाहत्यांना तिच्या कातील अदांनी घायाळ करत असते. तिचे अप्रतिम एक्सप्रेशन्स आणि डान्स मुव्ह्ज म्युझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. आज तिची फॅन फॉलोविंग इतकी आहे की, तिचा कोणताही म्युझिक व्हिडिओ आला की, तो धमाल करतोच. सध्या तिचे कोणतही नवीन गाणे प्रदर्शित झाले नाही, तर दुबईच्या रस्त्यावर भोजपुरी गाणे ‘गोदनवा’वर तिचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लटके-झटके देत आणि अप्रतिम भाव दाखवताना दिसत आहे.

नीलमने तिचा डान्स व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती दुबईच्या रस्त्यावर दिसत आहे आणि यादरम्यान तिने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला आहे. डान्सचा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच तिने “गोदनवा हार्ट इमोजी दुबई,” असे एक छान कॅप्शनही लिहिले आहे. यासोबतच तिने वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी टॅगही केले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये नीलम खूपच क्यूट दिसत आहे आणि ती अप्रतिम एक्सप्रेशन्स तसेच डान्स मूव्ह्ज दाखवत आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत आहे.

‘गोदनवा’ या भोजपुरी गाण्याच्या ओरिजनल व्हिडिओबद्दल बोलायचे झाले, तर शिल्पी राजच्या आवाजात हे गाणे नीलम गिरीवर चित्रित करण्यात आले आहे. हा म्युझिक व्हिडिओ गेल्या महिन्यातच युट्यूबवर प्रदर्शित झाला होता. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून इंटरनेटवर धुमाकूळ घालत होते. या गाण्यात अभिनेत्रीने एका विवाहित महिलेची भूमिका साकारली आहे, जी आपल्या पतीच्या नावाचा टॅटू काढण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, जे ऐकून आनंद लुटता येईल.

मात्र, नीलम गिरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दुबईला जाण्यापूर्वी समर सिंगसोबत अभिनेत्रीचा ‘पेन्ही जब लाले लाल साडीया हो’ हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला. या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. एका दिवसात या व्हिडिओला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे समर सिंगने आपल्या उत्तम आवाजाने सजवले होते. याशिवाय ती अभिनेता प्रवेशलाल यादवसोबत ‘इज्जत घर’ या आगामी चित्रपटाची शूटिंग करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाविषयी या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? वाचा

-‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

-अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

हे देखील वाचा