Wednesday, October 9, 2024
Home बॉलीवूड ‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

अभिनेत्री डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांनी ‘मंजिल मंजिल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाला 39 वर्षे पूर्ण झाली आहेत. नासिर हुसैन यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट 16 नोव्हेंबर, 1984मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात डॅनी डॅन्झोपा, प्रेम चोप्रा, कुलभूषण खरबंदा आणि आशा पारेख यांसारखे कलाकार होते. चित्रपट बनवताना काही अशा गोष्टी घडत असतात, ज्या नेहमीच आठवणीत राहतात. शूटिंग दरम्यान कलाकार एकमेकांच्या जवळ येतात. त्यामुळे चित्रपटासोबत त्यांचे किस्से देखील प्रसिद्ध होतात. असेच काहीसे डिंपल कपाडिया आणि सनी देओलसोबत झाले होते.

या चित्रपटाच्या यशाने डिंपल रातोरात स्टार झाली होती. पहिल्याच चित्रपटाने तिने प्रेक्षकांच्या मनात तिची जागा निर्माण केली होती. यावेळी राजेश खन्ना यांना डिंपल एवढी आवडली होती की, त्या दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी ‘काका’ने तिच्यासमोर अशी अट ठेवली होती की, ती चित्रपटात काम करणार नाही. कमी वयात प्रेमात पडलेल्या डिंपलला लग्नाशिवाय समोर काहीच दिसत नव्हते आणि तिने चित्रपटसृष्टीला राम राम ठोकून त्यांच्या संसाराला सुरुवात केली, परंतु काही दिवसांनी त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली आणि त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तसेच, चित्रपटात काम करण्याचे मन बनवले. मात्र, तोपर्यंत १० वर्षे उलटले होते.. (Sunny Deol and dimple Kapadia first time worked together in film manzil manzil)

माध्यमांतील वृत्तांनुसार, जेव्हा डिंपलने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा काही कलाकार तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. यामुळे ‘राजेश खन्ना उपर आका नीचे काका’ यांसारख्या घोषणा होऊ लागल्या. अशातच काकासोबत पंगा घ्यायला कोण तयार नव्हते. सगळ्यांना असे वाटत होते की, डिंपलसोबत काम केल्यास राजेश खन्ना नाराज होतील, परंतु यात सनी देओलने डिंपलची साथ दिली.

नासिर हुसैन यांच्या ‘मंजिल मंजिल’ या चित्रपटात सनी डिंपलचा हिरो होता. डिंपलने 11 वर्षानंतर आगमन केले होते. त्यांचा हा चित्रपट काही खास चालला नाही, परंतु त्यांची जोडी मात्र सुपरहिट झाली होती. डिंपलला सनीने खूप पाठिंबा दिला होता. अशातच त्या दोघांच्या अफेअरबाबत बातम्या इंडस्ट्रीमध्ये पसरू लागल्या.

त्यावेळी सनीचे लग्न झाले होते तसेच डिंपलला‌‌ देखील दोन मुली होत्या, तरी देखील त्यांच्या या बातम्या येतच होत्या. माध्यमांतील वृत्तांनुसार, नासिर हुसैन हे सुरुवातीला ऋषी कपूर यांना मुख्य भूमिकेत घेणार होते. मात्र, कोणत्यातरी कारणाने ऋषी यांनी चित्रपट करण्यास नकार दिला आणि ही संधी सनीला मिळाली.

हेही नक्की वाचा-
आतापर्यंत बेबी बंप फोटो शेअर केलेल्या सर्व अभिनेत्रींना रुबिनाने टाकले मागे, पाहा बाेल्ड फाेटाे
रश्मिकानंतर आता काजोल बनली डीपफेक व्हिडिओची शिकार, अभिनेत्रीचे कपडे बदलतानाचे अश्लील फोटो व्हायरल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा