भोजपुरी अभिनेता समर सिंगला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. भोजपुरी प्रेक्षकांमध्ये त्याची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्याचा कुठलाही व्हिडिओ किंवा गाणे आले की, सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतेच. अशात आता अभिनेत्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने अभिनेत्री श्वेता महारासोबत त्याचे भोजपुरी गाणे ‘ककरी भइल कमरिया लपक के २’ वरील डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
समरने त्याचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो पांढऱ्या रंगाची पँट आणि निळ्या शर्टसह चष्मा घातलेला दिसला आहे. यासोबतच श्वेताचा वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे. चाहत्यांनाही त्यांचा लूक खूप आवडला आहे. ऑडी आणि मर्सिडीज या आलिशान गाड्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या आजूबाजूला दोन्ही कलाकार ‘ककरी भइल कमरिया लपक के २’ या भोजपुरी गाण्यावर मस्त चाल दाखवत आहेत. त्यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते.
या व्हिडिओला अल्पावधीतच ७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते त्यांच्या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. तसेच, ते त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या लूक आणि डान्स स्टेप्सचे कौतुक करत आहेत.
‘ककरी भइल कमरिया लपक के २’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर ते मूळतः समर सिंग आणि आकांक्षा दुबे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच धमाल करत होते. हा व्हिडिओ आतापर्यंत ५ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. एवढेच नाही, तर तीन लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
समर सिंग आणि शिल्पी राज यांनी ते गायले होते. याचे गीत इम्रान भाई यांचे असून संगीत दिग्दर्शक आशिष वर्मा आहेत. हे गाणे ‘ककरी भइल कमरिया लपक के’ चा दुसरा भाग आहे. हा व्हिडिओ सोनू शर्माने दिग्दर्शित केला होता. कोरिओग्राफी गोल्डी-बॉबीने केेली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सरावादरम्यान मांजरीसोबत खेळताना दिसला विराट, पत्नी अनुष्काने कमेंट करताच म्हणाला, ‘…मुंबईची मांजर’