विकीच्या एक्स गर्लफ्रेंडने लावले कॅटरिनाच्या ‘या’ गाण्यावर ठुमके, बेली डान्सवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे खूप पसंत केले जात आहे. या गाण्याची मूळ अभिनेत्री रवीना टंडननेही कॅटरिनाचे कौतुक केले. नुकताच विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान, विकीची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. कॅटरिना कैफच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या नवीन गाण्यावर हरलीन सेठी जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

या गाण्यात कॅटरिना सिल्व्हर साडी आणि ब्लाऊजमध्ये डान्स करत आहे. आता कॅटरिनाच्या गाण्यावरील हरलीन सेठीचा व्हिडिओ चर्चेत आहे. यामध्ये हरलीनला काळ्या रंगाचा चमकदार क्रॉप टॉप आणि त्याच रंगाची पँट घालून बेली डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी चार तास रिहर्सल केल्याचा खुलासा केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ते सर्व, जे मला आव्हान देतात, ते मला जिवंत वाटण्यास मदत करतात. ४ तासांच्या रिहर्सलनंतर, डान्सचे एक पूर्णपणे नवीन रूप. (बेली डान्स करणे कठीण आणि टेक्निकल आहे) नवीन टीचर संजना मथुरेजा, ज्यांनी मला एका दिवसात या ‘टिप-टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स शिकवण्याची धडपड केली.”

कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या रोका सेरेमनीच्या अफवा ऑगस्टपासून इंटरनेटवर चर्चेत आहेत. मात्र, केवळ कॅटरिनाच नाही, तर विकी कौशलनेही असा कोणत्याही सेरेमनीला नकार दिला आहे. मात्र, सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये कॅटरिना आणि विकी एकत्र दिसल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी कौशल आणि कॅटरिना कैफ या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्न करणार आहेत. कॅटरिना कैफपूर्वी विकी कौशलचे नाव हरलीन सेठीसोबत जोडले गेले होते. दोघांनीही बराच काळ एकमेकांना डेट केले होते, पण नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच चकित केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

-सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार


Latest Post

error: Content is protected !!