बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. करण जोहरने २२ नोव्हेंबरला या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर धमाकेदार दिसणार आहेत. याआधी ही जोडी ‘रूही’ चित्रपटात दिसली होती, ज्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘दोस्ताना २’ मधून वगळण्यात आल्याने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनला मोठा धक्का बसला. जान्हवी कपूरसोबत झालेल्या वादामुळे त्याने हा चित्रपट सोडल्याचे बोलले जात आहे. आता यानंतर कार्तिकच्या हातून आणखी एक चित्रपट सुटल्याची माहिती समोर आली आहे.
कार्तिक आर्यनकडे होता ‘हा’ चित्रपट
‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये करण जोहरला सर्वप्रथम कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरला एकत्र घ्यायचे होते, पण करण जोहरच्या ‘दोस्ताना २’सोबत हा चित्रपटही कार्तिक आर्यनच्या हातून निसटला. माध्यमांतील वृत्तांनुसार, यावर्षी कार्तिक आणि जान्हवीमध्ये मतभेद झाले होते. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते. यानंतर जान्हवीने कार्तिक आर्यनशी सर्व संपर्क तोडला होता.
डेट्समध्ये करत होता टाळाटाळ
माध्यमांतील वृत्तांनुसार, कार्तिक डेट्समध्ये टाळाटाळ करत होता. यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग सतत पुढे ढकलावे लागले. अखेर कार्तिकच्या वागणुकीनंतर करण जोहरने त्याला चित्रपटातून हाकलून दिले आणि चित्रपट राजकुमार रावच्या खात्यात गेला. त्याचवेळी ‘दोस्ताना २’बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाचे ६० टक्के शूटिंगही झाले होते आणि त्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती.
२०२२ मध्ये होणार प्रदर्शित
‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. शरण शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शरण शर्मा यांनी ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’चे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट ७ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
कार्तिक आर्यनने केला ‘धमाका’
त्याचवेळी कार्तिक आर्यनबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच त्याचा ‘धमाका’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये तो अँकर आणि पत्रकाराची भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. याशिवाय कार्तिक आर्यन ‘फ्रेडी’, ‘भूल भुलैया २’, ‘शहजादा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’मध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो
-बॉलिवूडची सर्वात यशस्वी स्क्रिप्ट रायटरची जोडी ‘सलीम – जावेद’ तुटली तरी कशी, जाणून घ्या