एफआयआर दाखल केल्याची माहिती देताना कंगनाने शेअर केला तिचा बोल्ड फोटो


कंगना रानौत आणि वाद हे दोन्ही शब्द एकत्रच येतात. कंगना रानौत जेवढी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत येते तेवढीच किंबहुना त्याहून अधिक ती तिच्या वादांमुळे चर्चेत येते. ती सतत या ना त्या वादात अडकलेली दिसते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बिनधास्त आणि बेधडक वक्तव्य करणारी कंगना नेहमीच तिच्या बोलण्यामुळे वादात अडकते. खुद्द तिने स्वतः एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, तिच्यावर असंख्य एफआयआर दाखल आहे. मात्र असे असूनही ती बोलण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही.

नुकतेच मोदी सरकारने शेतकरी कायदा मागे घेतल्यानंतर कंगनाने या शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तानी आंदोलनाशी केली आहे. त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये कंगनावर एफआयआर दाखल केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच कंगनावर शीख समुदायावर आपत्तीजनक टिप्पणी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. कंगनाने नुकतीच तिच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्यावर एफआयआर दाखल झाल्याची माहिती दिली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगना अतिशय बोल्ड आणि मादक अशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून, तिच्या हातात वाईनचा ग्लास आहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, “अजून एक दिवस, अजून एक एफआयआर…जर ते मला अटक करायला येतील तर…सध्या माझा मुड घरी असा आहे.” या फोटोमध्ये कंगना रिलॅक्स आणि चिल करताना दिसत आहे.

कंगनाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक विवादित पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने लिहिले होते की, “खलिस्तानी आतंकवादी आज भलेही सरकारचे हात मुरगळत आहे, मात्र त्या स्त्रीला (इंदिरा गांधी) विसरून चालणार नाही, जिने आपल्या चपलांखाली यांना दाबले होते. जिवाच्या किमतीवर त्यांना डासांसारखे मारले गेले, मात्र देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या निधनानंतर आजही त्यांच्या नावाने सर्वच लोकं घाबरतात, यांना असच गुरु पाहिजे.”

कंगनावर भोईवाडा पोलीस स्थानक दादर येथे एक तक्रार दाखल केली आहे. ज्यात तिच्यात आयपीसी सेक्शन १५३, 153A, १५३B, ५०४, ५०५, ५०५(२) आणि IT कायदा २००० मधील धारा ७९ अंतर्गत तिचाय्वर एफआयआर दाखल केली गेली आहे. दिल्लीमध्ये देखील कंगनावर तक्रार दाखल केली आहे. सरकारने कृषी कायदा मागे घेतल्यामुळे कंगना खूपच निराश झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश

-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर

-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट


Latest Post

error: Content is protected !!