कलाकारांना दिवसातील जवळपास २०/२० तास काम करावे लागते. त्यांना सुट्टी देखील घेता येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा कलाकरांना थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते त्यांच्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जातात. मागील काही काळापासून पाहिले तर संपूर्ण बॉलिवूड सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला जाताना दिसतात. हिंदी सिनेसृष्टी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजवारी अभिनेत्री पूजा हेगडे देखील सध्या मालदीवमध्ये तिच्या सुट्ट्या व्यतीत करत आहे.
पूजाने तिच्या या सुट्ट्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. तिचे हे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
पूजा हेडगेने फ्लोरल मोनोकिनी घालून अंडर वॉटर स्विमिंगचा आनंद लुटला. एका फोटोमध्ये ती समुद्रात स्विमिंग करताना दिसत असून, कॅमेऱ्याकडे पाहून तिने दोन्ही हात लांब करून पोज दिली आहे. एका फोटोमध्ये ती लायनिंगच्या शर्टमध्ये दिसत असून, या शर्टवर तिने बिकिनी बॉटम घातला आहे. तिचा हा नो मेकअप लूक चांगलाच व्हायरल होत आहे. पूजाने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करताना लिहिले, “फाउंड निमो. हे आणि तिचा मित्र खूपच क्युट आहे.”
पूजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूजाने आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहेंजोदारो’ सिनेमातून ऋतिक रोशनसोबत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘हाऊसफुल्ल ४’ मध्ये दिसली. तिच्या आगामी कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती प्रभाससोबत ‘राधे श्याम’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाला असून, त प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-युविका चौधरीच्या अगोदर ‘या’ सुंदऱ्यांसोबत जोडलं गेलंय प्रिन्सचं नाव, नोरा फतेहीचाही आहे समावेश
-भररस्त्यात पती रोहनप्रीतसोबत रोमान्स करताना दिसली नेहा कक्कर, गायिकेचे ‘लिप-लॉक’ फोटो आले समोर
-‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच उघडली शर्टची बटणं आणि पँटची झिप, व्हायरल होतंय बोल्ड फोटोशूट










