टीव्हीवरील सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडलचा १२’ (Indian Idol 12) वा सीझन चांगलाच हिट ठरला आहे. ‘इंडियन आयडल १२’ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. या शोच्या टॉप ६ स्पर्धकांबद्दल सांगायचे झाले तर आजच्या घडीला हे सर्वजण त्यांची स्वप्ने जगताना दिसत आहेत. यावेळी पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, दानिश मोहम्मद यूकेमधील अनेक लाईव्ह शोमध्ये दिसले होते. लवकरच निहाल तौर आणि षण्मुखप्रिया देखील त्यांच्यासोबत सामील होतील. हे सर्व लोक पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये राहणार आहेत. एकूणच, टॉप ६ स्पर्धकांकडे यावेळी काम किंवा पैशांची कमतरता नाही. पण प्रत्येकाचे नशीब असे असतेच असे नाही.
सवाई भट्ट ‘इंडियन आयडल १२’ चा देखील एक भाग होता आणि प्रेक्षकांनी तसेच शोच्या सर्व परीक्षकांनी त्याच्यावर खूप प्रेम केले. अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीही त्याच्या गायनाची चाहती होती. शो संपताच हिमेश रेशमियाने त्याचे अनेक म्युझिक व्हिडिओही काढले, ज्यांना युट्यूबवरही चांगला प्रतिसाद मिळाला. आता सवाई पुन्हा ‘इंडियन आयडल १२’ पूर्वी जे जीवन जगत होता तेच जीवन जगत असून, तो अजूनही गरिबीशी झुंज देत आहे. त्याचे स्वप्न होते की, तो स्वत:चे घर विकत घेऊ शकेल, परंतु आजपर्यंत तसे झाले नाही.
‘इंडियन आयडल’पूर्वी सवाई गावोगावी जाऊन कठपुतली शो करायचा, पण आता त्यात कोणालाच रस नाही. अशा स्थितीत सवाईचे हे कामही जवळपास ठप्प झाले आहे. आता सवाई कसा तरी आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहे. सवाईने राजस्थान सरकारकडे पैशांची मदत मागितली होती, मात्र आतापर्यंत त्याला कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
जेव्हा सवाई भट्ट ‘इंडियन आयडल १२’ चा भाग बनला, तेव्हा निर्मात्यांनी नॅशनल टीव्हीवर त्याची गरिबी दाखवली होती. दरम्यान, सवाईचे काही जुने फोटोही व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तो एका वेगळ्याच रुपात दिसत होता. नंतर लाइव्ह शोचा भाग होण्यासाठी त्याने तो गेटअप घेतल्याचे समोर आले. या फोटोंमुळे सवाईला खूप ट्रोल केले जात होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला