मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित


अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) होय. त्यांनी मराठी तसेच अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच त्यांनी तमिळ आणि तेलुगू चित्रपटात देखील काम केले आहे. नुकतेच त्यांच्या मुलाचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांना अभिषेक (Abhishek Gunaji) नावाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याचा साखरपुडा अगदी थाटामाटात झाला आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव राधा पाटील (Radha Patil) असे आहे. अभिषेक हा देखील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे.

अभिषेक आणि राधा मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. अशातच त्यांनी घरच्यांच्या परवानगीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राधा ही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. (Marathi actor milind gunaji’s son Abhishek gunaji got engaged)

अभिषेकचे शिक्षण मुंबईमधील नामांकित रुईया शया कॉलेजमधून झाले आहे. वडील आधीपासून अभिनय क्षेत्रात असूनही त्याने अभिनयात जाण्याऐवजी दिग्दर्शनाचा मार्ग निवडला. त्याने बरेच चित्रपट आणि व्यावसायिक जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. यासोबतच त्याला गायन आणि फोटो ग्राफिकची देखील आवड आहे.

अभिषेकने ‘छल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याचे वडील मिलिंद गुणाजी आणि सुमित राघवन हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते. तसेच अनेक जाहिरातींचे देखील दिग्दर्शन केले आहे. यासोबतच त्याने ‘आपलं कर्जत जामखेड’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

त्याचे वडील मिलिंद गुणाजी हे चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘पानिपत’, ‘रेस ३’, ‘ऑक्सिजन’, ‘बाबू जी एक तिकीट मुंबई’, ‘प्रेम कहाणी एक लपलेली गोष्ट’, ‘कौल मनाचा’, ‘लेक लाडकी’, ‘सांभा’, ‘एक शोध’, ‘लागली पैंंज’, ‘यह मेरा इंडिया’, ‘ब्लॅक अँड व्हाईट’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-‘बाबा जाऊ नको दूर…’, वडिलांच्या निधनाची माहिती देत, सायली संजीवने शेअर केली भावनिक नोट

-‘भावा कमाल आहेस तू’, म्हणत समीर चौगुलेकडून जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा!


Latest Post

error: Content is protected !!