जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपली व्यक्ती मानतो आणि तीच व्यक्ती आपल्यातील एखाद्या कमी असलेल्या गोष्टीची खिल्ली उडवते, तेव्हा त्यांना चुकीचे सिद्ध करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय बनते. अशीच एक गोष्ट अमेरिकन मॉडेल आणि बिझनेसवुमन कायली जेनरशी (Kylie Jenner) संबंधित आहे. जेव्हा कार्दशियन बहिणीने (Kardashian Sisters) तिच्या बॉयफ्रेंडच्या कमेंटनंतर लिप किट नावाची स्वतःची कॉस्मेटिक लाइन सुरू केली. त्यामुळे ती लहान वयातच अब्जाधीश झाली.
हॉलिवूडच्या कार्दशियन सिस्टर्स जगभर प्रसिद्ध आहेत, आणि मॉडेल आणि बिझनेसवुमन कायली जेनरची सर्वाधिक चर्चा असते. काइली तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे खूप ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जगभरातील चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओ लाईक करतात. पण एक काळ असा होता की, कायलीचे ओठ छोटे होते आणि तिच्या बॉयफ्रेंडने तिची त्यावरूनच खिल्ली उडवली होती.
अवघ्या २४ वर्षांची कायली जेनरने टीव्ही शो ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन’मध्ये सांगितले की, जेव्हा तिला तिच्या ओठांमुळे असुरक्षित वाटू लागले तेव्हा तिने मेकअप करायला सुरुवात केली. मॉडेलने सांगितले होते की, किस घेतल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडने ही कमेंट केली होती. सोबतच म्हटले होते की, ती चांगली किस घेणारी आहे पण तिचे ओठ खूपच लहान आहेत. यानंतर कायलीला वाटू लागले की, ती किस घेण्याच्या लायक नाही. इथूनच कायलीने लिप फिलर्सचा प्रयोग सुरू केला.
कायलीने वयाच्या १९ व्या वर्षी ‘कायली लिप किट’ नावाची स्वतःची कॉस्मेटिक लाइन सुरू केली हे फार लोकांना माहीत नाही. पुढे ते लोकप्रिय झाले आणि कायलीने त्याचे नाव ‘कायली कॉस्मेटिक्स’ ठेवले. या व्यवसायाने ती आज कोट्याधीश झाली असून, तिचा मेकअप ब्रँड जगभरात लोकप्रिय आहे. सध्या कायली जेनर दुसऱ्यांदा गरोदर असून, लवकरच तिच्या घरात आणखी एक लहान मूल जन्माला येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला