अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली ‘तांडव’ वेबसीरिज गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आतातर तांडव टीमला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास देखील नकार दिला आहे, अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जावे, असेही सांगितले आहे. यासर्व अनपेक्षित घटनांमुळे शर्मिला टागोर यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला आहे.
जशी तांडव वेबसिरीज प्रदर्शित झाली तशी अगदी पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तेव्हापासूनच शर्मिलाजींच्या तब्बेतीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातच करीना आणि सैफ लवकरच आई, बाबा होणार आहे. अशावेळी त्यांना शांतता आणि प्रसन्न वातावरण आवश्यक आहे, मात्र ही सिरीज सतत वादात सापडत असल्याने शर्मिलाजी करीनासाठी जास्त चिंताग्रस्त आहे.
त्या नेहमीच सैफला सार्वजनिक विधानं आणि नवीन प्रोजेक्ट्स घेण्याआधी अनेकदा विचार करायचा सल्ला देत असतात. मात्र आता यासर्व ‘तांडवा’नंतर सैफने ठरवले आहे की, नवीन प्रोजेक्ट्सच्या स्क्रिप्ट तो नेहमी दोनदा, तीनदा वाचणार आणि त्याच्या आईचा देखील सल्ला घेऊन मगच होकार देणार.
शर्मिलाजींनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘एक अभिनेता म्हणून सैफ कोणताही धोका घेण्यापासून घाबरत नाही. तो नेहमीच त्याच्या भूमिका विचारपूर्वक निवडतो, कोणत्याही भूमिकेचा नीट चहुबाजूनी विचार करून मगच त्या प्रोजेक्ट्साठी होकार देतो. पण कधीकधी यातही समस्या निर्माण होतात.
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच तांडव वेबसिरिजबद्दल झालेल्या सुनावणीत म्हटले आहे की, ‘ज्या कथांमध्ये लोकांच्या भावना जोडलेल्या असतात किंवा त्याच्या भावना दुखावल्या जातील अशा स्क्रिप्ट लिहूच नये.’
सोबतच कोर्टाने नोटीस काढत जाहीर केले की, ‘ज्या सहा राज्यांमध्ये तांडव विरोधात एफआईआर दाखल झाली आहे त्यांनी पुढच्या चार आठवड्यात जबाब नोंदवावा. ‘ सोबतच तांडवच्या निर्मात्यांचा अंतरिम जमीन नाकारत अटकपूर्व जामीन किंवा गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणायचा सल्ला दिला आहे.
तांडव वेबसिरीजच्या कलाकार व दिग्दर्शकाची जीभ कापून आणणाऱ्याला ही संघटना देणार १ कोटी
बॉलीवूडचा टॉम क्रूझ सतत अडकतोय वादात, तांडवमुळे पुर्वीचे वादही आलेत चर्चत
राम कदमांचे तांडव! सैफच्या बहुचर्चित सिरीजमधील त्या दृष्यावरुन राम कदमांची पोलीसांत तक्रार










