Monday, June 17, 2024

बॉलीवूडचा ‘टॉम क्रूझ’ सतत अडकतोय वादात, तांडवमुळे पुर्वीचे वादही आलेत चर्चत

बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खान आजकाल आपल्या वेब सिरीज ‘तांडव’ मुळे सतत चर्चेत आहे. त्याच्या ‘तांडव’ या वेबसिरीजमुळे बरेच वादंग आहेत. या वेबसिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप आहेत. पण, सैफची वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वैयक्तिक आयुष्याशी किंवा चित्रपटांशी संबंधित वादात सैफ अनेकदा अडकतो. बऱ्याचदा सैफ अली खानचं नाव हे विवादांमध्ये येतच असतं. तर आज आपण सैफच्या अशाच काही महत्त्वपूर्ण वादांबद्दल जाणून घेणार आहोत.

अदिपुरुष
‘तांडव’ रिलीज होण्यापूर्वीच सैफ त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अडकला होता. वास्तविक या चित्रपटाविषयी बोलताना सैफ एका मुलाखतीत म्हणाला की, ‘हा चित्रपट रावणाचा मानवी चेहरा दाखविण्याचा प्रयत्न करतो. रावणाने जे काही पाऊल उचलले होते ते का उचलले होते याबद्दल या चित्रपटात दिसणार आहे. सैफच्या या वक्तव्याचा लोकांनी तीव्र विरोध केला. यानंतर सैफने दिलगिरी व्यक्त करत म्हटलं होतं की, ‘माझ्या विधानामुळे जर कुणाचं मन दुखावलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’

तान्हाजी
अजय देवगन आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘तान्हाजी’ देखील सैफच्या नावामुळे वादात सापडला होता. या चित्रपटात सैफ खलनायकाच्या भूमिकेत होता. मात्र, त्याच्या एका विधानामुळे तो ट्रोल झाला. तान्हाजींबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, ‘चित्रपटात दाखवलेला हा खरा इतिहास आहे असे मला वाटत नाही. ब्रिटीशांपूर्वी भारताची काही संकल्पना होती असं मला वाटत नाही’. या वक्तव्यावरून त्याच्यावर समाजमाध्यमातून बरीच टीका झाली.

सेक्रेड गेम्स
‘तान्हाजी’ पूर्वी सैफचे बरेच चित्रपट पडद्यावर फ्लॉप जात होते, परंतु त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजचं प्रचंड कौतुक झालं. या वेबसिरीजमध्ये सैफ आणि नवाजुद्दीन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. परंतु, या वेबसिरिजचे अनेक मुद्दे वादात सापडले होते. वास्तविक १९८०च्या दशकाची पार्श्वभूमी सेक्रेड गेम्समध्ये दाखविली गेली होती. ज्यात नवाजुद्दीनचं पात्र गणेश गायतोंडे याने राजीव गांधी यांना बोफोर्स प्रकरणात जबाबदार धरलं होतं. इतकंच नाही तर राजीव गांधींना फट्टू म्हणणार्‍या या वेबसिरीजला कडाडून विरोध झाला.

तैमूरच्या जन्मासह सैफ आणि करीनाचा पुन्हा एकदा चर्चेत आले होते. २०१६ मध्ये करीनाने पहिल्या मुलाला तैमुरला जन्म दिला. त्यानंतर सैफने आपल्या मुलाचे नाव तैमुर ठेवले होते, यामुळे मोठा वाद झाला. सैफने एका क्रूर राज्यकर्त्याच्या नावावर आपल्या मुलाचं नाव का ठेवलं यावर बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. यावर सैफने स्पष्टीकरण दिलं होतं की, ‘या नावाशी संबंधित इतिहासाबद्दल मला माहिती आहे, परंतु या कारणास्तव मी माझ्या मुलाचं नाव तैमुर ठेवलेलं नाही. त्या राज्यकर्त्याचे नाव तिमुर होते तर मी माझ्या मुलाचे नाव तैमूर असं ठेवलं आहे.

हे देखील वाचा