दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे आज केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. केवळ आपल्या चमकदार कामगिरीनेच नाही, तर राजकारणी म्हणूनही रजनीकांत यांची खास ओळख आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे आज रजनीकांत यांच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड. रजनीकांत साेमवारी (12 डिसेंबर) त्यांचा 72वा वाढदिवस साजरा करत आहेत.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका गरीब कुटुंबात झाला. रजनीकांत चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे हवालदार होते. आई जिजाबाईंच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब विभक्त झाले. घरची परिस्थिती पाहून रजनीकांत हमाल म्हणून काम करू लागले. यानंतर त्यांनी सुतार म्हणून काम केले आणि दीर्घकाळानंतर ते बंगळुरू परिवहन सेवेत (बीटीएस) बस कंडक्टर म्हणून कार्यरत होते. पण अभिनयाची आवड असल्याने त्यांनी 1973 मध्ये मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचा डिप्लोमा केला.
रजनीकांत यांचा 23 ऑगस्ट 1975 रोजी पहिला चित्रपट ‘अपूर्व रागांगल’ प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि केवळ दक्षिणेतच नाही, तर संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर रजनीकांत यांनी 1983 मध्ये ‘अंधा कानून’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चनही दिसले होते.
यानंतर रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये ‘मेरी अदालत’, ‘जान जॉनी जनार्दन’, ‘भगवान दादा’, ‘दोस्ती दुश्मनी’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘असली नकली’, ‘हम’, ‘खून का कर्ज’, ‘क्रांतिकारी’, ‘अंधा कानून’, ‘चालबाज’, ‘इंसानियत का देवता’, ‘रोबोट’ या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर रजनीकांत यांनी स्वतःहून 8 वर्षांनी लहान लता रंगाचारी यांच्याशी लग्न केले. लताच्या त्यांच्या एका कॉलेज मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घ्यायला आल्या होत्या. याच मुलाखतीदरम्यान दोघांची भेट झाली. माध्यमांतील वृत्तानुसार, लताला पाहताच रजनीकांत त्यांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी 1981 मध्ये लग्न केले. लग्नानंतर त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली झाल्या.
रजनीकांत यांना 2014 मध्ये चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय रजनीकांत यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रजनीकांत यांना 45 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (2014) भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय त्यांना यंदाचा सिनेजगतातील सर्वोच्च मानाचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला. (birthday south superstar used to work as a coolie bus conductor know how rajinikanth became the god of cinema)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रजनीकांत यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक