बॉलिवूडचे लोकप्रिय कपल विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. अभिनेता आणि अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित अनेक फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते त्यांना भरभरून शेअर करत आहेत. दरम्यान, विकी-कॅटरिनाच्या लग्नाचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूरही दिसत आहे. होय, या जोडप्याच्या मेहंदीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये रणबीर विक्कीकडे पाहत आहे आणि आता हा फोटो सोशल मीडियावर हवेसारखा व्हायरल होत आहे.
लग्नाला गेला होता रणबीर कपूर?
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी ९ डिसेंबरला राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्टमध्ये शाही पद्धतीने लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी कडक नियम केले होते. विकी-कॅटरिना लग्नात सहभागी होण्यासाठी फोनपासून दूर राहणे आवश्यक होते, कारण अनावश्यक फोटो व्हायरल होऊ नयेत. दरम्यान, सध्या एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विक्की कॅटरिनाच्या मेहंदीमध्ये रणबीर कपूर देखील दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गुपचूप सलमानही पोहचला लग्नात
विशेष म्हणजे, या फोटोत सलमान खानही दिसत आहे. यात सलमान खान कॅटरिनाला डान्स करताना बघताना दिसतोय. तर रणबीर कपूर आणि सलमान खान खरोखरच विकी- कॅटरिनाच्या लग्नाला उपस्थित होते का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. हा फोटो एका इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या पेजवर असे अनेक फोटो आहेत, जे मॉर्फिंग करून शेअर करण्यात आले आहेत. तर यावरून हा फोटो खोटा असल्याचे सिद्ध होत आहे.
विकी कौशल आणि कॅटरिना कैफने त्यांचे नाते बरेच दिवस लपवून ठेवले होते. लग्नाच्या बातमीवरही दोघांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या जोडप्याने राजस्थानला जाऊन शाही पद्धतीने लग्न केले आणि त्यांच्या भव्यदिव्य लग्नाची चर्चा अजूनही संपूर्ण इंडस्ट्रीत आहे.
हेही वाचा-
पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग
एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख
समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर