स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा‘ ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील पात्र देखील सध्या चांगलीच लोकप्रिय होत आहेत. ऑनस्क्रीन जरी आपल्याला मालिकेत कलाकार एकमेकांशी भांडताना आणि राग करताना दिसत असले, तरी देखील ऑफस्क्रीन त्यांची केमेस्ट्री खूपच छान आहे. अशातच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या सेटवरून एक धमाल व्हिडिओ समोर आला आहे.
या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री विदिशा म्हसकर हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत मालिकेतील दीपा म्हणजेच रेशमा शिंदे दिसत आहे. त्या दोघी सध्या ट्रेंडिंग ‘लेझी लॅड’ या गाण्यावर डान्स करत आहेत. दीपा तिच्या साध्या पोशाखात दिसत आहे, तर विदिशा मालिकेतील तिच्या पात्राच्या कपड्यात दिसत आहे. (Reshma shinde and vidisha mhaskar dance video viral on social media)
त्या दोघीही अत्यंत सुंदर पद्धतीने डान्स करत असतात. त्या डान्स करत असतात तितक्यात मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साईशा भोईर येते आणि डान्स करायला लागते. त्यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्या तिघींना एकत्र पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपा आणि कार्तिक हे एकमेकांपासून दुरावले आहेत, तर आयशाला आता कार्तिकसोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे ती गेले ६ वर्ष कार्तिकची वाट बघत आहे. त्यामुळे ती आता कार्तिक आणि दीपाचा घटस्फोट व्हावा यासाठी ती पूर्ण प्रयत्न करत आहे.
या मालिकेत रेशमा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. रेश्माने या आधी ‘लगोरी’, ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘केशरी नंदन’ या मालिकानमध्ये काम केले आहे. परंतु तिचे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा नावाचे पात्र चांगलेच गाजले आहे. अनेकांना तिचे हे पात्र खूप आवडत आहे.
हेही वाचा :
‘द एक्सपोज’ फेम सोनालीने ‘या’अभिनेत्यासोबत केलंय टॉपलेस फोटोशूट; वाचा ‘कॅलेंडर गर्ल’बद्दल खास गोष्टी