‘अगंबाई सासूबाई’ मधील शुभ्राने दिल्या बबड्याला वाढदिवसाच्या शुभेच्या, कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष


तेजश्री प्रधान (Tejashri pradhan) ही मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून तिने एका सोज्वळ, निरागस आणि हुशार मुलीचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला. टेलिव्हिजनवरील तिच्या सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. तिच्या वेगळ्या भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडल्या. काही महिन्यांपूर्वी तिची झी मराठीवर ‘अगंबाई सासूबाई‘ ही मालिका चालू होती. मालिकेतील तिच्या शुभ्रा या पात्राला खूप प्रेम मिळाले. मालिकेत शुभ्रा आणि बबड्याची जोडी सगळ्यांना खूप आवडली होती. अभिनेता आशुतोष पत्की हा मालिकेत मुख्य भूमिकेत होता.

मालिका संपल्यावर देखील त्या दोघांची जोडी ऑफस्क्रीन तेवढीच चर्चेत राहिली. ते दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाईक आणि कमेंट करत असतात. अशातच आशुतोषचा वाढदिवस झाला आहे. त्यानिमित्त तेजश्रीने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करून त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (Tejashri pradhan share a photo Ashutosh Patki and give him birthday wishesh)

तेजश्रीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आशुतोषसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, आशुतोष लॅपटॉपमध्ये बघत बसला आहे, तर तेजश्री त्याच्याकडे हसून बघत आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “माझ्यासोबत कामामध्ये, गुन्ह्यात, सर्जनशीलतेमध्ये, मारामारीत, हसण्यात, व्यंगात, गॉसिपिंगमध्ये आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीत साथ देणाऱ्या माझ्या सोबतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” तिच्या या पोस्टवर अनेकांच्या कमेंट येत आहेत. आशुतोषचे चाहते या पोस्टवर कमेंट करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि तेजश्री हे रिलेशनमध्ये आहेत अशा चर्चा देखील चालू होत्या. परंतु त्या दोघांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत काम करताना मालिकेचा नायक शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांनी लग्न देखील केले होते. परंतु वैयक्तिक मत भेदावरुन त्यांच्या लग्न तुटले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर शशांकने दुसरे लग्न केले परंतु तेजश्रीने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

हेही वाचा 

नैराश्याशी झुंज देतेय मिलिंद सोमणची पत्नी, पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘सर्वकाही ठीक नाही, मी रडते जेव्हा…’

उर्फी जावेदचा इस्लामवर नाही विश्वास; म्हणाली, ‘मुस्लिम मुलाशी कधीच लग्न करणार नाही’

अंधारात टॉर्च लावून ईशा गुप्ताने दिल्या ‘अशा’ पोझ, बाथरूममधील व्हिडिओ आला समोर

 

 


Latest Post

error: Content is protected !!