बिग बॉस मराठी या रंगतदार शोचा रविवारी (२६ डिसेंबर) ग्रँड फिनाले रंगला आहे. घरात टॉप ३ स्पर्धक राहिले होते. घरात विकास, विशाल आणि जय दुधाने राहिले होते. अशातच घरातून विकास पाटील हा बाहेर गेला आहे आणि या शोचे टॉप २ स्पर्धक घोषित झाले आहेत.
बिग बॉसच्या घरात विकास पाटीलचा प्रवास सुरुवातीपासूनच खूप रंजक ठरला आहे. घरात येत्या क्षणीच त्याने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. घरात त्याची आणि विशालची मैत्री गाजली. टीम ‘बी’ मधील विकास, विशाल, मीनल आणि सोनाली यांचा ग्रुप खूप गाजला. विकासने हा सुरुवातीपासूनच घरात एक फेअर गेम खेळून सगळ्यांना त्याच्याकडे आकर्षित केले. घरातील टास्क आणि सगळी कामं देखील त्याने केली आहेत. (Bigg Boss Marathi 3 : vikas patil is second runner up winner
विकास बाहेर गेल्यामुळे घरात आता जय आणि विशाल उरले आहेत. त्या दोघांपैकी आता या शोचा विजेता घोषित केला जाणार आहे. दोघेही घरातील तगडे स्पर्धक आहेत. त्यामुळे आता कोण जिंकेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दोघांचेही जबरदस्त चाहते आहेत. त्यामुळे त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा :
बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार खासगी कार्यक्रमांना आणि लग्नांना हजेरी लावण्यासाठी घेतात कोट्यवधी रुपये
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून धाकड गर्ल बाहेर, मीनल शाह ट्रॉफीपासून झाली दूर
मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक