बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून धाकड गर्ल बाहेर, मीनल शाह ट्रॉफीपासून झाली दूर


बिग बॉस मराठीच्या फिनालेमधून एक स्पर्धक बाहेर पडली आहे. बिग बॉसमधील ‘धाकड गर्ल’ मीनल शाह ही घरातून बाहेर गेली आहे. खरंतर तिचा समावेश टॉप २ स्पर्धकांमध्ये होतो, परंतु तिला काही प्रमाणात प्रेक्षकांचे प्रेम कमी मिळाल्याने ती बाहेर गेली आहे. या बातमीने तिच्या सगळ्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

बिग बॉसच्या प्रवासात सगळ्या मुलींमध्ये केवळ मीनल शाह इथपर्यंत आली होती. ती मुलांच्या बरोबरीने खेळ खेळली आहे आणि प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. मैत्री असो किंवा टास्क असो तिने तिचे १००% दिले आहे. (Bigg Boss Marathi 3 : meenal Shah eliminate from BBM house

अशातच ती घराबाहेर गेल्याने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. परंतु बिग बॉसच्या घरात ४ मुलांना टक्कर देत ती इथपर्यंत आली आहे. त्यामुळे हाच मीनलचा खरा विजय आहे. तिच्या चाहत्यांसाठी ती तेव्हाच विजेती झाली आहे, जेव्हा ती १४ स्पर्धकांना टक्कर देत टॉप ५ मध्ये आली. त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलासा वाटत आहे. आता घरात ४ तगडे स्पर्धक राहिले आहेत. घरात विशाल, विकास, जय आणि उत्कर्ष राहिले आहेत. त्यामुळे पुढची स्पर्धा त्यांच्यामध्ये होणार आहे.

हेही वाचा :

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव

 


Latest Post

error: Content is protected !!