Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड वर्षातील शेवटच्या दिवशी वर्कआउट करत, कॅटरिना कैफने २०२१ ला दिला हटके निरोप

वर्षातील शेवटच्या दिवशी वर्कआउट करत, कॅटरिना कैफने २०२१ ला दिला हटके निरोप

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार २०२१ वर्षाचा निरोप घेत नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत आहेत. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लॅनिंग शेअर करत आहेत. त्यासह आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना भेट देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिचे अपडेट्स देणारी अभिनेत्री कॅटरिना कैफनेही तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

कॅटरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कॅटरिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे.

शुक्रवारी (३१ डिसेंबर) कॅटरिनाने (Katrina Kaif) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. तिच्या फिटनेसबद्दल सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “वर्षातील शेवटचा वर्कआउट.” यासोबत तिने डान्सिंग आणि स्टार इमोजी बनवले आहेत. तिच्या या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम व प्रतिसाद देत आहेत. तिच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत ४०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

कॅटरिना कैफने ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हॉटेल सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये विकी कौशलशी लग्न केले. कॅटरिना आणि विकी कौशलच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कॅटरिना कैफ दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या पुढच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शूटिंगसाठी दिसली. या चित्रपटात ती विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. याशिवाय कॅटरिना कैफ सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. कॅटरिना कैफ आणि सलमान खानने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ज्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा