Thursday, July 18, 2024

मल्लिका शेरावतच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोने लावली सोशल मीडियावर आग, चाहतेही म्हणाले, ‘हॉलिवूड स्टाईल…’

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. यानंतरही तिची फॉलोविंग जबरदस्त आहे आणि तिचे करोडो चाहते आहे. मल्लिका ही अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लूक आणि बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. हॉट अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री मल्लिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकताच तिने तिचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावली आहे.

आता मल्लिकाच्या (Mallika Sherawat) लेटेस्ट फोटोंनी इंटरनेटचा पारा चढवला आहे. या फोटोमध्ये मल्लिका मनमोहक पोझ देत आहे. मल्लिकाच्या या लेटेस्ट फोटोवर तिचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत.

मल्लिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा सुपर स्टनिंग फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने गोल्डन कलरचा फ्रिल असलेला शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. मल्लिकाने गुडघे टेकून जमिनीवर पोझ दिली आहे.

फोटोमध्ये मल्लिकाने तिचे केस मोकळे सोडले आहेत. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत मल्लिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लुक ऑफ द डे.” तिच्या चाहत्यांना हा फोटो आणि लूक खूप आवडला आहे.

मल्लिकाच्या स्टाईल आणि लूकवर चाहते फिदा झाले आहेत. त्यासह त्यावर भरपूर कमेंट करत आहेत. एका चाहत्यावर कमेंट करताना लिहिले, “जस्ट हॉलिवूड स्टाईल. तुम्ही असेच पुढे जा.” इतर अनेक युजर्सनी देखील मल्लिकाच्या या पोझचे वर्णन हॉलिवूड स्टाईल असे केले आहे. अनेक चाहते तिच्या या फोटोवर गॉर्जियस, ब्युटीफुल, बोल्ड आणि सेक्सी अशा कमेंट करत आहेत.

मल्लिका शेरावतने 2002 मध्ये ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटात त्यांची भूमिका चांगलीच पसंतीस उतरली होती. या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लॉस एंजेलिसमध्ये मल्लिका शेरावत जगतेय लक्झरी आयुष्य, घराचे व्हिडिओ पाहून चाहतेही झाले हैराण

‘मर्डर’ चित्रपटात हॉट केमिस्ट्री दाखवणारे इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्यात आहे अबोला, पण का?

हे देखील वाचा