टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ हा एक लोकप्रिय शो आहे. हिंदीमधील या शोची लोकप्रियता बघता हा शो मराठीमध्ये देखील सुरु केला गेला आहे. मराठीमध्ये या शोचे दोन सिझन पूर्ण झाले आहेत. यातील सर्वात चर्चेत दुसरा सिझन आणि यातील स्पर्धक होते. या शोमधील सर्वांचाच लाडका आणि विजेता स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. शिव हा बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. शिव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अशातच शिवचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डान्सर जुईली वैद्य हिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शिव ठाकरेसोबत जबरदस्त डान्स परफॉर्मन्सवर देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने शिवला टॅग केले आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘दिल को तुम से प्यार हुआ’ हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही खूप सुंदर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. (Shiv thakre’s dance video viral on social media)
त्यांचा हा फोटो व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. खास म्हणजे जुईलीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर शिव ठाकरेने देखील कमेंट केली आहे. त्याने कमेंट केली आहे की, “मॅडमला मॅच करणं शक्य नाही बाबा. पोरी थॅंक यू सो मच.” तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीणाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच वीणाने तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू देखील हटवला आहे.
या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.
हेही वाचा :
दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!
‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा
‘अंगात आलया’ गाण्यावर जॉनी लिव्हरने धरला मुलांसोबत ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है










