Friday, April 19, 2024

‘अंगात आलया’ गाण्यावर जॉनी लिव्हरने धरला मुलांसोबत ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है

झोंबिवली‘ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. खास म्हणजे या चित्रपटातील ‘अंगात आलया’ हे गाणे चर्चेत आहे. गाण्याचे संगीत आणि डान्स प्रेक्षकांना डान्स करण्यास प्रवृत्त करतो. या गाण्यावर अनेक कलाकारांनी व्हिडिओ तयार केले आहेत. अशातच बॉलिवूडमधील हास्याचा राजा जॉनी लिव्हर याने त्याच्या मुलांसोबत या गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, जॉनी लिव्हर त्याची मुलगी जेमी लिव्हर आणि मुलगा जेसी लिव्हरसोबत डान्स करताना दिसत आहे. तिघेही अत्यंत मजेशीर अंदाजात डान्स करत आहेत. या बाप लेकांचा डान्स पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्या तिघांचे अनेक असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला चाहते जोरदार प्रतिसाद देत असतात. अशातच त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप भावला आहे. (Johnny lever dance with her children in angat alaya song)

‘झोंबिवली’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, अमेय वाघ, वैदेही परशूरामी हे कलाकार आहे. आदित्य सरपोतदार याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंगात आलया’ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सिद्धार्थ जाधव दिसत आहे. या गाण्याने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. गाणे सध्या जोरदार गाजत आहे. सगळे प्रेक्षक आता हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा :

जेव्हा संजय खान यांनी झीनत अमान यांना सर्वांसमोर केली बेदम मारहाण, अभिनेत्रीला गमवावी लागली डोळ्याची दृष्टी

मुलीच्या चेहऱ्यावर आहेत पुरुषांपेक्षा जास्त केस; पण लाज घेऊन जगण्यापेक्षा, ती जगासमोर बनलीय उदाहरण

असं काय घडलं की, सलमानला सात वेळा बदलावा लागला ब्रेसलेटचा स्टोन! का आहे इतका खास?

 

हे देखील वाचा