Monday, June 23, 2025
Home मराठी कूल लूक शेअर करून अभिजीत खांडकेकरने केले २०२२ मध्ये पदार्पण, फोटो झाले व्हायरल

कूल लूक शेअर करून अभिजीत खांडकेकरने केले २०२२ मध्ये पदार्पण, फोटो झाले व्हायरल

माझ्या नवऱ्याची बायको‘ या मालिकेने अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन केले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी देखील मालिकेतील पात्र सगळ्यांना अजूनही लक्षात आहेत. या मालिकेत अनिता दाते, रसिका सुनील आणि अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत होते. मालिकेत लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला होता. खास गोष्ट म्हणजे मालिकेत अभिजीत हा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही भूमिकेत दाखवला होता. मालिका संपली तरी देखील तो चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो शेअर करत असतो. अशातच २०२२ च्या सुरुवातीला त्याचा एक कूल लूक समोर आला आहे.

अभिजीतने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, त्याने या फोटोमध्ये टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे. तसेच त्याने यावर निऑन कलरचे शूज घातले आहे. या फोटोमध्ये तो खूपच खुश दिसत आहे. तो कोणत्यातरी शोच्या सेटवर दिसत आहे. (abhijeet khandkekar share his cool look on social media)

हे फोटो शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “या नवीन वर्षात फक्त टीवरील डिझाईनचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर असेच हास्य कायम राहो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” त्याने शेअर केलेले हे फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिजीतने २०१० साली झी मराठी या वहिनीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ का मालिकेत मृणाल दुसानिससोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यांची प्रेमकहाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले. या मालिकेने जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्याने २०१३ साली अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिच्याशी विवाह केला. सुखदा देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अहिल्या’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.

अभिजीतने ‘जय महाराष्ट्र’, ‘भय’, ‘मी पण सचिन’, ‘ढोल ताशे’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘ध्यानी मनी’, ‘बाबा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘क्रिमिनल्स : चाहूल गुन्हेगाराची’ या मालिकेत होस्ट म्हणून काम करत आहे.

हेही वाचा :

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

 

हे देखील वाचा