‘भीडू’ म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले जॅकी श्रॉफ यांनी सोमवारी (1 फेब्रुवारी) आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि त्यांना दीर्घायुष्य व चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. जॅकी श्रॉफ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जाणून घेऊयात.
बॉलिवूडमध्ये लव्ह मॅरेज हे काही नवीन नाही. आपण याबद्दल अनेक किस्से ऐकले असतील. अनेक नामांकित व्यक्तींची नावेही त्यात आहेत. पण आज आपण जॅकी श्रॉफ यांच्याबद्दल बोलू जे बॉलिवूडमध्ये ‘भीडू’ या नावाने ओळखले जातात. त्याची प्रेमकथाही खूप रंजक आहे.
जॅकी श्रॉफ हे लहानपणीच प्रेमात पडले होते. त्यांनी या किस्स्यांचा उल्लेख आपल्या जीवनात बर्याचदा केला आहे. जॅकी श्रॉफ यांनी त्या मुलीशी लग्न केले, जिला त्यांनी पहिल्यांदा स्कूल बसमधून डोकावताना पाहिले होते. त्यांचे हे प्रेम दुसरे तिसरे कोणी नसून आयशा आहे. ती बसमधील खिडकीजवळ बसली होती, तेव्हा जॅकी श्रॉफ तिच्या जवळ गेले आणि बोलले की, ते तेथील जवळच्या मैदानावर खेळत असतात.
जॅकी आणि आयशाची दुसरी भेट रेकॉर्ड शॉपमध्ये झाली होती. आयशाला काही रेकॉर्ड खरेदी करायचे होते, तेव्हा जॅकीने उशीर न करता ते खरेदी करून दिले. तिथे त्यांनी आयशाला काही सल्ला दिला. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर आयशाला त्यांच्यात आवड निर्माण झाली आणि हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागली. जॅकी म्हणतात की, ‘त्यांनी त्याचवेळी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.’
दोघांनीही अगदी लहान वयातच एकमेकांशी लग्न करायचे ठरवले होते. याला आयशाच्या घरातून विरोध होत होता. आयशा एका श्रीमंत कुटुंबातील होती. त्यांची आईपण या नात्याविरूद्ध होती. पण आयशानेही जॅकीशी लग्न करण्याचा निर्धारच केला होता. हे नाते अनेक अडचणींमधूनही पुढे जात राहिले.
शेवटी या दोघांनी 1987 साली लग्न केले. या परिपूर्ण जोडप्याला दोन मुले आहेत. टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ. जॅकी श्रॉफने बालपणात खूप गरिबी पाहिली होती. पण एक दिवस अचानक त्यांचे नशिब उलटले आणि त्यांना मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या.
त्यांनी 1982 मध्ये देव आनंदच्या ‘स्वामीदादा’ या चित्रपटापासून अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा मंडळी-
प्रेम प्रेम असतं! जॅकी श्रॉफसाठी अलिशान घर सोडून आयशा आली होती चाळीत राहायला
‘त्या’ दिवशी जर जॅकी श्रॉफ बसस्टॉपवर उभा नसता, तर बॉलीवूडला कधी ‘जग्गूदादा’च मिळाला नसता
मुलगा शेर तर आई सव्वाशेर! वयाच्या ६०व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याच्या आईने उचलले चक्क ९५ किलो वजन