मुलगा शेर तर आई सव्वाशेर! वयाच्या ६०व्या वर्षी ‘या’ अभिनेत्याच्या आईने उचलले चक्क ९५ किलो वजन


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयसोबतच डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. श्रॉफ परिवारात फक्त टायगरच नाही तर त्याची बहीण कृष्णा श्रॉफ देखील फिटनेसबाबत जागरूक असते. जरी कृष्णा अभिनयात नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. या दोघांसोबतच त्यांची आई आयेशा श्रॉफ आणि अभिनेता जॅकी श्रॉफ देखील फिटनेसबाबत लक्ष देतात. श्रॉफ परिवाराचा फिटनेस त्यांना पाहिल्यावर लक्षात येतोच मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप गाजताना दिसत आहे. त्याच व्हिडिओमुळे श्रॉफ परिवार खूप चर्चेत आला आहे.

हा व्हिडिओ आहे टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफचा. आयेशा श्रॉफचा फिटनेस तिच्या फोटोंवरून, व्यायामाच्या व्हिडिओवरून सर्वांच्या लक्षात येतच असतो. मात्र जेव्हा तुम्हीही आयेशा श्रॉफचा हा व्हिडिओ पाहाल तेव्हा नक्कीच तुमचे डोळे मोठे होतील. हा व्हीडिओ आहे एका जिम मधला. जिममध्ये आयेशाने चक्क ९५ किलो वजन उचलले आहे. हो हो ९५ किलो. विश्वास बसत नाहीये ना मग बघा हा व्हिडिओ.

आयेशाने जिम मध्ये ९५ किलो वजन उचलत सर्वाना आश्चर्याचा मोठा धक्काच दिला. कारण जेव्हा ६० वर्षाची आयेशा ९५ किलो वजन उचलते म्हटल्यावर धक्का तर बसणारच ना.. या व्हिडिओमध्ये आपण टायगर श्रॉफला देखील पाहू शकता. त्याने देखील त्याच्या आईचे या वजनदार कामगिरीचे कौतुक केले आहे.

आयेशाने तिचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेयर केला असून, सोबत लिहिले आहे की, ‘सरळ शेवटी ९५ किलो’. हा व्हिडिओ पाहून कृष्णा श्रॉफ आणि दिशा पाटणीने व्हिडिओवर कमेंट केली आहे. कृष्णाने लिहिले की, शाबास मुली, तर दिशाने लिहिले अदभूत ताकद.

आयेशा आज जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी, ती पूर्वीच्या काळी एक अभिनेत्री आणि मॉडेल होती.


Leave A Reply

Your email address will not be published.