‘म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?’ हा डायलॉग तुम्ही नक्कीच ऐकला असेल. हा डायलॉग आहे २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दंगल‘ या सिनेमातील. ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानचा हा डायलॉग. हा डायलॉग त्याने आपल्या ऑनस्क्रीन मुलींसाठी वापरला होता. त्यातीलच एक मुलगी म्हणजे फातिमा सना शेख. तिने सिनेमात गीता फोगाट या महिला कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. तिला या पात्राने जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. मात्र, तिने इथपर्यंत पोहोचण्यापूर्वी खूप खस्ता खाल्ला आहे. मंगळवारी (११ जानेवारी) फातिमा आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा सिनेप्रवास तसेच आयुष्यातील काही खास गोष्टी.
पडद्यावर ‘गीता’ बनलेल्या फातिमाचा (Fatima Sana Shaikh) जन्म ११ जानेवारी, १९९१ रोजी हैदराबाद येथे झाला होता. फातिमाच्या आईचे नाव राज तबस्सुम आहे, तर वडिलांचे नाव विपीन शर्मा. विशेष म्हणजे, फातिमाचे वडील हिंदू आहेत, तर आई मुस्लिम. फातिमा दोन्ही धर्मांचा आदर करते. असे म्हणतात की, फातिमाच्या जन्मानंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ते नंतर पुन्हा हैदराबादला गेलेच नाहीत.
हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय
फातिमाने मुंबईच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. फातिमा लहान असतानाच तिने १९९७ साली आलेल्या ‘इश्क’ या सिनेमातून कारकिर्दीची सुरुवात केली होती. या सिनेमात आमिर खान, अजय देवगण, काजोल आणि जूही चावला मुख्य भूमिकेत होते. याव्यतिरिक्त ती दाक्षिणात्य सुपरस्टार ‘चाची ४२०’ मध्ये झळकली. यावेळी ती अवघ्या ६ वर्षांची होती. तसेच तिने किंग खान शाहरुख, जूही चावला यांच्या ‘वन २ का ४’ या सिनेमातही काम केले होते.
अनेक नकारांचा केला सामना
फातिमासाठी बॉलिवूडमध्ये नाव कमावणे खायची गोष्ट नव्हती. तिला अनेक नकारांचा सामना करावा लागला आहे. तिने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, कारकिर्दीत तिला इतक्यांदा नकार मिळाला होता की, ते तिला स्वत:लाच आठवत नाही. आता तिला ते लक्षातही ठेवायचे नाही. मात्र सततच्या चित्रपटांच्या अपयशामुळे फातिमा सना शेखच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. एक दिवस तिच्या मनानेही ठरवलं होतं की, इंडस्ट्री सोडायची. तिला फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे तिला फोटोग्राफर व्हावे असे वाटत होते. पण तिने या क्षेत्रात काम करणे सुरूच ठेवले. फातिमा ही अभिनयासाठीच बनली होती. म्हणून तिने अभिनय सोडला. मात्र, अभिनयानेच तिची निवड केली.
ती ‘बिट्टू बॉस’ आणि ‘आकाशवाणी’ यांसारख्या २१ सिनेमात झळकली होती, पण अद्याप तिला यश मिळाले नव्हते. सतत अपयशी होणाऱ्या फातिमाला नशिबाने संधी दिली आणि ‘दंगल’ सिनेमासाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. एकामागून एक ऑडिशनमध्ये ती यशस्वी होत गेली आणि अशा प्रकारे तिने ऑडिशनच्या ६ फेऱ्या पार केल्या. अशाप्रकारे ती ‘गीता फोगट’च्या भूमिकेत पक्की झाली.
मिळाली अमाप प्रसिद्धी
फातिमाला यशस्वी सिनेमाची पहिली चव ही ‘दंगल’ सिनेमातून चाखायला मिळाली. या सिनेमात तिने ‘गीता फोगाट’ हे पात्र साकारले होते. या सिनेमात तिच्यासोबत आमिर खान (Aamir Khan), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), झायरा वसीम (Zaira Wasim), साक्षी तन्वर (Sakshi Tanwar) आणि अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने स्वत: जबरदस्त मेहनत घेतली आणि कुस्तीचे दावपेच शिकले होते. सोबतच तिने आपल्या फिटनेसवरही जबरदस्त काम केले.
फातिमाचा लग्नावर नाही विश्वास
लग्न ही गोष्ट सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. पण फातिमा याबाबतीत जरा वेगळी ठरते. तिचा लग्नावर विश्वास नाही. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला कधीच लग्न करायचे नाही. कारण माझा लग्नावर विश्वास नाही. माझा असा विश्वास आहे की, जर तुम्हाला एखाद्यासोबत राहायचे असेल, तर कोणत्याही कागदपत्रात लिहून ते नाते सिद्ध करण्याची गरज नाही. कोणत्याही कागदपत्रावर लग्न केले म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करता असा होत नाही.”
ट्रोलिंगचाही केला सामना
फातिमाने एकदा स्विमसूट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्यानंतर अनेकांनी तिला धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या शूटिंगदरम्यान फातिमाचे नाव अभिनेता आमिर खानसोबत देखील जोडले गेले होते, परंतु फातिमाने नंतर ही बातमी अफवा असल्याचे सांगितले.
हेही वाचा-