ऋतिक अन् सुझान यांचा घटस्फोट आहे सिनेसृष्टीतील सर्वात महागडा घटस्फोट, दिली तब्बल ‘इतकी’ पोटगी

बॉलिवूडचा सुपर डांसर, कुल अभिनेता ऋतिक रोशनचे (Hrithik Roshan) चाहते हे जगभरात पसरलेले आहेत. आपल्या दमदार अभिनय आणि कलाकृतीतून त्याने लोकांना आपला जबरा फॅन बनवलंय. १० जानेवारी १९७४ रोजी जन्मलेला ऋतिक आज ४८ वा वाढदिवस साजरा करतोय. परंतु, फिटनेसच्या बाबतीत वयाच्या ४८ व्या वर्षीही ऋतिक २५ वर्षांच्या मुलांना मागे टाकतो. ऋतिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी!

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिकने बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट केले आहेत, परंतु माध्यमांमध्ये त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याचा घटस्फोटच जास्त चर्चेत राहिला. २०१४ मध्ये जेव्हा ऋतिक आणि सुझानच्या घटस्फोटाची बातमी अचानक समोर आली तेव्हा चाहते आश्चर्यचकित झाले. (hrithik roshan birthday story sussanne and hrithik fell in love on a traffic signal 14 years later settle divorce on huge alimony)

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

ऋतिक आणि सुझानने २००० मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या १४ वर्षानंतर या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांत हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत चर्चेत असायच्या.

View this post on Instagram

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

त्यांच्या घटस्फोटाची बाब ही आश्चर्यचकित करणारी यासाठीही होती कारण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणी त्यांनी प्रेमविवाह केला होता. आपल्याला ठाऊक आहे का की एका ट्रॅफिक सिग्नलवर या दोघांची प्रेमकथा सुरू झाली.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

दोघेही आपआपल्या कारमध्ये बसले होते आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते. सुझानला पाहताच ऋतिक स्वतःचं अस्तित्वच विसरून गेला. ऋतिकने कसा तरी सुझानशी संपर्क साधला. सुरुवातीच्या काही छोट्या भेटीनंतर दोघे अनेकदा डेटवर जाऊ लागले. असे करून पुढील दोनच वर्षात त्यांनी लग्न केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

लग्नानंतर ऋतिक आणि सुझानची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांमध्ये झाली होती. परंतु, १४ वर्षानंतर हे संबंध संपुष्टात आले. त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण कधीच समोर येऊ शकलं नाही. माध्यमांनुसार, सुझान ही अर्जुन रामपालच्या जवळ जात होती, त्यामुळे दोघांचाही घटस्फोट झाला. याशिवाय असंही म्हटलं जातं की, “काईट्स” चित्रपटाच्या वेळी ऋतिक आणि बार्बरा मोरीमध्ये वाढत्या जवळीकीमुळे हृतिकला सुझान सोडून गेली होती.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

अर्थात, कारण काहीही असो, दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. या घटस्फोटानंतर ऋतिकने सुझानला पोटगी म्हणून जवळजवळ ३८० कोटी रुपये दिले. त्याने दिलेली पोटगीची रक्कम ऐकूनच चाहत्यांना धक्का बसला होता. ऋतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.

आज ऋतिक आणि सुझान एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी त्यांची मैत्री आजही कायम आहे. दोघेही अतिशय हुशारीने आपल्या मुलांचं संगोपन करतायत. इतकंच नव्हे तर वेगळं राहूनही दोघेही बऱ्याचदा मुलांसोबत वेळ घालवताना एकत्र दिसतात.

हेही नक्की वाचा-

Latest Post