Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मौनी रॉय दुबईत नाही, तर गोव्यात करणार लग्न? जाणून घ्या बॉयफ्रेंड सूरजसोबत कधी घेणार सात फेरे

अनेक सेलिब्रिटींनी २०२१ लग्न करून आपला संसार थाटला आहे. यावर्षीही अनेक सेलिब्रिटी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत आणि या यादीत मौनी रॉयचेही नाव आहे. होय, आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी मौनी आता लाखो चाहत्यांची मने तोडून लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षभरापासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मौनी दुबईतील सूरज नांबियारला डेट करत आहे. यापूर्वी बातम्या येत होत्या की, मौनी दुबईत लग्न करणार आहे. पण आता लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

मौनी (Mauni Roy) २७ जानेवारीला गोव्यात लग्न करणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, लग्नाच्या ठिकाणासाठी पंचतारांकित रिसॉर्ट बुक करण्यात आले आहे. पाहुण्यांना लग्नाची आमंत्रणे पाठवली आहेत. याशिवाय पाहुण्यांना याबद्दल कोणालाही सांगण्यास मनाई आहे. सर्व पाहुण्यांना लसीकरण प्रमाणपत्र सोबत आणण्यास सांगितले आहे. हे लग्न दिवसा होणार आहे.

लग्नानंतर दोघेही २८ जानेवारीला डान्स पार्टीचे आयोजन करतील, जिथे दोघेही कुटुंब आणि मित्रांसोबत पार्टी करतील. मौनीचे मित्र प्रतीक उत्तेकर आणि राहुल शेट्टी तिची डान्स रिहर्सल करत आहेत. ज्या सेलिब्रिटींना लग्नाची आमंत्रणे मिळाली आहेत. त्यात करण जोहर, एकता कपूर, मनीष मल्होत्रा ​​आणि आश्का गोराडिया यांचा समावेश आहे. आतापर्यंत या कलाकारांची नावे लग्नासाठी कन्फर्म झाल्याचे सांगितले जात आहे.

अशीही बातमी येत आहे की, मौनीचा बॉयफ्रेंड सूरज सध्या भारतात आहे आणि स्वतःला लाइमलाइटपासून वाचवत आहे. याआधी मौनीने गोव्यात बॅचलर पार्टी केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या गर्ल गँगसोबत खूप मस्ती केली होती. जरी कोणीही पुष्टी केली नाही की, त्या मौनीच्या बॅचलर पार्टीला जात आहेत. परंतु प्रत्येकाने अप्रत्यक्षपणे मौनीसाठी पोस्ट केले. ज्यामध्ये त्या अभिनेत्रीसाठी स्पेशल मेसेज लिहित होते.

मौनीचे व्यावसायिक जीवन

मौनीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे झाले, तर तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या शोमधून केली. यानंतर तिने ‘कस्तुरी’, ‘दो सहेलिया’, ‘देवों के देव महादेव’, ‘नागिन, ‘नागिन २’ मध्ये काम केले आहे.

यानंतर मौनी चित्रपटांकडे वळली आणि २००४ मध्ये ‘रन’ चित्रपटात एक खास गाणे दिले. त्यानंतर मौनीने एका पंजाबी चित्रपटात काम केले. यानंतर मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘मेड इन चायना’, ‘लंडन कॉन्फिडेन्शियल’, ‘वेले’ या चित्रपटात काम केले. आता मौनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा